Product SiteDocumentation Site

Red Hat Enterprise Linux 6

प्रकाशन टिपा

Red Hat Enterprise Linux 6.1 करीता प्रकाशन टिपा

चिन्ह

Legal Notice

Copyright © 2011 Red Hat.
The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
 RaleighNC 27606-2072 USA
 Phone: +1 919 754 3700
 Phone: 888 733 4281
 Fax: +1 919 754 3701

Abstract
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशने वैयक्तिक वाढ, सुरक्षात्मक व बग निवारण एराटाचे एक संग्रह आहे. Red Hat Enterprise Linux 6.1 प्रकाशन टिपांमध्ये Red Hat Enterprise Linux 6 कार्यप्रणालीमध्ये केलेले मुख्य बदलांचे व किर्कोळ प्रकाशनकरीता सहाय्यक ॲप्लिकेशन्स्चे दस्तऐवजीकरण समाविष्टीत आहे. या किर्कोळ प्रकाशनातील सर्व बदलांविषयी तपशील टिपण्णी तांत्रिक टिपा येथे उपलब्ध आहे.

1. हार्डवेअर समर्थन
2. कर्नल
3. डेस्कटॉप
4. स्टोरेज
5. प्रमाणीकरण व इंटरऑपरेबिलिटि
6. सुरक्षा
7. प्रतिष्ठापन
8. कंपाईलर व साधने
9. क्लस्टरिंग
10. आभासीकरण
11. एंटाइटलमेंट
12. सामान्य सुधारणा
A. आवृत्ती इतिहास

1. हार्डवेअर समर्थन

नेटवर्क संवादकरीता नामांकन पद्धती
पारंपारिकरित्या, Linux मधील नेटवर्क संवाद eth[X] या प्रमाणे नामांकीत केले जाते. तरी, बहुतांश घटनांमध्ये, हे नावे या छॅसिस्वर प्रत्यक्ष लेबल्स्शी परस्पर राहत नाही. आधुनिक सर्व्हर प्लॅटफार्म्स् वरील एकापेक्षा जास्त नेटवर्क अडॅप्टर्स्ना या नेटवर्क संवादचे नॉन-डिटरमिनिस्टिक व काऊंटरइंट्युटिव्ह नेमिंग आढळू शकतात.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये biosdevname समाविष्ट केले आहे, नेटवर्क संवादच्या नामांकनकरीता एक वैकल्पिक पद्धती. फिजिकल ठिकाणावर आधारित biosdevname नेटवर्क संवादकरीता नावांचे वाटप करतो. टिप, पूर्वनिर्धारितपणे Dell प्रणालीच्या मर्यादित संचाच्या व्यतिरिक्त, biosdevname बंद केले जाते.
biosdevname च्या वापर विषयी पुढील माहितीकरीता Red Hat क्नॉलेड्ज बेस पहा.
USB 3.0
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये युनिवर्सल सिरिअल बस (USB 3.0) विवरणची आवृत्ती 3.0 संपूर्णतया समर्थीत गुणविशेष आहे. USB 3.0 समर्थन पूर्वीच्या प्रकाशनात तंत्र पूर्वदृष्य़ म्हणून समाविष्ट केले गेले होते.
CPU व मेमरी हॉट-ॲड
Nehalem-EX वर, Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये CPUs व मेमरीची हॉट-ॲडिंग आत्ता पूर्णतया समर्थीत आहे. टिप, तरी हार्डवेअरने हॉट-ॲडिंग देखील समर्थीत करायला हवी. हॉट-ॲडिंगकरीता समर्थन विना हार्डवेअरवरील CPUs किंवा मेमरीला हॉट-ॲड करण्याचा प्रयत्न करतेवेळी हानी होऊ शकते.
ड्राइव्हर सुधारणा
Red Hat Enterprise Linux 6.1 गुणविशेषमध्ये ड्राइव्हर सुधारणांची मोठी व्याप्ति समाविष्टीत आहे, ज्यामध्ये खालील डिव्हाइस ड्राइव्हर्स् करीता सुधारणा समाविष्टीत आहे:
  • Intel 10 Gigabit PCI Express Network साधनांकरीता ixgbe ड्राइव्हर
  • Mellanox ConnectX HCA InfiniBand हार्डवेअरकरीता mlx4 ड्राइव्हर, जेणेकरून Mellanox Connect X2/X3 10GB साधनांकरीता समर्थन पुरवतात
  • ServerEngines BladeEngine2 10Gbps नेटवर्क साधनांकरीता be2net ड्राइव्हर
  • Broadcom NetXtreme II नेटवर्क साधनांकरीता bnx2 ड्राइव्हर, ज्यामध्ये 5709 साधनांकरीता Advanced Error Reporting (AER), व PPC समर्थन समाविष्टीत आहे
  • Broadcom NetXtreme II iSCSI करीता bnx2i ड्राइव्हर
  • Broadcom Everest नेटवर्क साधनांकरीता bnx2x ड्राइव्हर
  • igbvfixgbevf वर्च्युअल फंक्शन ड्राइव्हर्स्
  • Broadcom Tigon3 इथरनेट साधनांकरीता tg3 ड्राइव्हर
  • Brocade फाइबर वाहिनी ते PCIe होस्ट बस अडॅप्टर्स् करीता bfa ड्राइव्हर
  • Brocade 10G PCIe इथरनेट कंट्रोलर्स् करीता bna ड्राइव्हर
  • cxgb4 driver for Chelsio Terminator4 10G Unified वायर नेटवर्क कंट्रोलर्स् करीता
  • ServerEngines BladeEngine 2 Open iSCSI साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हर
  • ServerEngines BladeEngine2 10Gbps नेटवर्क साधनांकरीता be2net ड्राइव्हर
  • एम्यूलेक्स फाइबर चॅनल HBAs करीता lpfc ड्राइव्हर
  • Intel PRO/1000 नेटवर्क साधनांकरीता e1000e1000e ड्राइव्हर्स्
  • Intel आर्यन पाँड इथरनेट ड्राइव्हर
  • Intel केलसि पिक वायरलेस ड्राइव्हर
  • Intel SCU ड्राइव्हर
  • LSI MegaRAID SAS कंट्रोलर्स् करीता megaraid_sas ड्राइव्हर
  • LSI Logic पासूनचे SAS-2 श्रेणीच्या ॲडॅप्टर्स् करीता mpt2sas ड्राइव्हर

2. कर्नल

Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये शिप केलेल्या कर्नलमध्ये Linux कर्नलच्या सुधारणाकरीता अनेक शंभरी बग निवारण समाविष्टीत आहे. या प्रकाशनकरीता कर्नलमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक बग निवारण व प्रत्येक सुधारणाविषयी तपशीलकरीता, Red Hat Enterprise Linux 6.1 तांत्रिक टिपा. मधील कर्नल अध्याय पहा
कंट्रोल ग्रूप्स्
कंट्रोल ग्रूप्स् Linux कर्नलचे गुणविशेष आहे ज्यांस Red Hat Enterprise Linux 6 मध्ये समाविष्ट केले. प्रणाली हार्डवेअरसह परस्पर क्रिया योग्यपणे नियंत्रीत करण्यासाठी प्रत्येक कंट्रोल ग्रूपमधील कार्यांना ठराविक गटात समाविष्ट केले जाते. कंट्रोल ग्रूप्स् द्वारे वापर होत असलेल्या प्रणाली स्रोतचे नियंत्रण शक्य आहे. याच्या व्यतिरिक्त, प्रणाली प्रशासक कंट्रोल ग्रूप इंफ्रास्ट्रक्चरचा वापर ठराविक कंट्रोल ग्रूप्स्ला प्रवेश प्रणाली स्रोत जसे कि मेमरी, CPUs (CPUs चे गट), नेटवर्किंग, I/O, किंवा शेड्युलर करीता प्रवेश शक्य किंवा अशक्य करण्यासाठी करू शकतात.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये कंट्रोल ग्रूप्स् करीता अनेक सुधारणा व अद्ययावत समाविष्ट करतो, ज्यामध्ये ब्लॉक साधन इंपुट/आऊटपुट (I/O) यांस ठराविक साधनकरीता थ्रॉटल करणे समाविष्ट आहे, एकतर बाईटस् दर सेकंद किंवा I/O पर सेकंद (IOPS).
याच्या व्यतिरिक्त, श्रेणीय ब्लॉक साधन कंट्रोल ग्रूप्स् निर्माण करण्यासाठी, libvirt व इतर युजरस्पेस् साधनांसह एकीकरण क्षमता पुरवले आहे. नवीन ब्लॉक साधन कंट्रोल ग्रूप ट्युनेबल group_idle, सहजता जपवून उत्तम थ्रुपूट पुरवते.
Red Hat Enterprise Linux 6.1 नवीन autogroup गुणविशेष देखील समाविष्ट करतो, ज्यामुळे प्रलंबन कमी होतात व CPU केंद्रित वर्कलोडवेळी अधिक परस्पर कार्यांकरीता परवानगी दिली जाते. cgsnapshot साधन, तुम्हाला सध्याचे कंट्रोल ग्रूप संरचनाचे स्नॅपशॉट घ्यायला क्षमता पुरवते.

पुढील वाचन

कंट्रोल ग्रूप्स् व इतर स्रोत व्यवस्थापन गुणविशेष तपशीलमध्ये Red Hat Enterprise Linux 6 मधील स्रोत व्यवस्थापन पुस्तिका येथे उपलब्ध आहे
नेटवर्किंग सुधारणा
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये रिसिव्ह पॅकेट स्टिअरिंग (RPS) व रिसिव्ह फ्लो स्टिअरिंग (RFS) करीता समर्थन पुरवले आहे. रिसिव्ह पॅकेट स्टिअरिंग येणाऱ्या नेटवर्क पॅकेटस्ला एकापेक्षा जास्त CPU कोर्स् वर विश्लेषण शक्य करते. ठराविक ॲप्लिकेशनकरीता उद्देशीत नेटवर्क डाटा विश्लेषीत करण्यासाठी रिसिव्ह फ्लो स्टिअरिंग कमाल CPU ची नीवड करतो.
kdump
kdump प्रगत क्रॅश डम्पिंग पद्धती आहे. सुरू केल्यावर, प्रणाली दुसऱ्या कर्नलच्या संदर्भातून बूट होते. हे दुसरे कर्नल लहान स्मृती आरक्षीत करते, व त्याचे कार्य फक्त प्रणाली क्रॅश झाल्यावर कोर डम्प प्रतिमा प्राप्त करणे एवढेच असते.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये कर्नल मेसेज डम्पर समाविष्ट आहे, ज्यांस कर्नल पॅनिक आढळल्यावर कॉल केले जाते. कर्नल मेसेज डम्पर सोपे क्रॅश विश्लेषण पुरवतो व तिसरे पक्षीय कर्नल मेसेज लॉगिंगला वैकल्पिक लक्ष्यकरीता परवानगी देतो.
याच्या व्यतिरिक्त, crashkernel=auto घटक मांडणी काढून टाकली जाते. पूर्वनिर्धारित घटक मांडणी आत्ता crashkernel=:[@offset] असे आहे.
कामगिरी अद्ययावत व सुधारणा
Red Hat Enterprise Linux 6.1 मधील कर्नल खालील लक्षणीय कामगिरी सुधारणा पुरवतो:
  • ट्रांस्परेंट ह्युज पेजेस् (THP) समर्थनकरीता अद्ययावत व सुधारणा
  • perf_event करीता सुधारणा, लॉक घटनांच्या विश्लेषणकरीता नवीन perf lock गुणविशेष समाविष्ट करत आहे.
  • kprobes जम्प ऑप्टिमाइजेशन, ज्यामुळे ओव्हरहेड कमी होते व सिस्टमटॅप कामगिरी सुधारित होते.
  • i7300_edaci7core_edac करीता सुधारणा, ज्यामुळे Intel 7300 चिपसेटचा वापर करणाऱ्या मदरबोर्ड्सवरील मेमरी त्रुटींच्या नियंत्रणकरीता समर्थन पुरवणे शक्य होते

3. डेस्कटॉप

ग्राफिक्स् हार्डवेअर
ग्राफिक्स् हार्डवेअरकरीता Red Hat Enterprise Linux 6.1 सुधारणांची व्याप्ति पुरवते. सँडि ब्रिज् प्रोसेसरवरील Intel Generation 6 Graphics करीता ड्राइव्हरला या प्रकाशनात समाविष्ट केले आहे, ज्यामुळे या साधनावरील पूर्णतया ॲक्सिलरेटेड 2D व 3D ग्राफिक्स् पुरवले जाते. याच्या व्यतिरिक्त, हे प्रकाशनात Matrox MGA-G200ER ग्राफिक्स् चिपसेटकरीता समर्थन समाविष्ट केले आहे.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये XGI Z9S AND Z11 चिपसेटस् करीता xorg-x11-drv-xgi व्हिडीओ ड्राइव्हर समाविष्ट केले आहे. जुण्या XGI हार्डवेअरकरीता पुरवलेले SIS ड्राइव्हर नवीन हार्डवेअरकरीता समर्थन पुरवण्यासाठी सुधारीत केले जात नाही.
कार्यप्रणालीकरीता एक्सटेंडेड डिस्पले आइडेंटिफिकेशन डाटा (EDID) न पुरवणाऱ्या मॉनिटर्सकडे आत्ता 1024 x 768 पिक्सेल्स्ची पूर्वनिर्धारित रेजॉल्यूशन आहे.
नेटवर्क मॅनेजर
NetworkManager डेस्कटॉप साधन आहे, ज्याचा वापर नेटवर्क जोडणी प्रकारचे सेट अप, संरचना व व्यवस्थापनकरीता केला जातो. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये, NetworkManager मध्ये Wi-Fi प्रोटेक्टेड ॲक्सेस् (WPA) एंटरप्राइज व इंटरनेट प्रोटोकॉल आवृत्ती 6 (IPv6) च्या संरचनाकरीता सुधारित समर्थन समाविष्टीत आहे.
ऑडिओ
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये सुधारित ॲडवांस्ड् Linux साऊंड आर्किटेक्चर - हाय डेफिनेशन ऑडिओ (ALSA-HDA) ड्राइव्हर्स् समाविष्ट केले आहे.

4. स्टोरेज

मिरर्स्चे LVM स्नॅपशॉट्स्
LVM स्नॅपशॉट गुणविशेष सर्व्हिस व्यत्यय निर्माण न करता लॉजिकल वॉल्यूमचे बॅकअप प्रतिमा निर्माण करण्यास सक्षमता पुरवतो. स्नॅपशॉट घेतल्यानंतर मूळ साधनात (द ओरिजिन) बदल केल्यावर, स्नॅपशॉट गुणविशेष बदलेले डाटा क्षेत्राचे प्रत तयार करतो जे बदल अगोदर सारखेच असते जेणेकरून त्या यंत्राच्या स्तराची पुनर्रचना शक्य होईल. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये मिरर्ड् लॉजिकल वॉल्यूमचे स्नॅपशॉट घेण्याची क्षमता पूर्णतया समर्थीत गुणविशेष आहे.
मिरर्स्चे LVM स्ट्राइप्स्
LVM मध्ये आत्ता RAID0 (स्ट्रिपिंग) व RAID1 (मिररिंग) ला एकाच लॉजिकल वॉल्यूम अंतर्गत एकत्र शक्य आहे. लॉजिकल वॉल्यूमचे निर्माण तसेच परस्परित्या मिरर्स्ची संख्या ('--mirrors X') व स्ट्राइप्स्ची संख्या ('--stripes Y') निर्देशीत केल्याने मिरर साधने निर्माण होतात ज्यांचे घटकीय साधने स्ट्रिप केलेले असतात.

5. प्रमाणीकरण व इंटरऑपरेबिलिटि

सिस्टम सेक्युरिटि सर्व्हिसेस् डिमन (SSSD)
सिस्टम सेक्युरिटि सर्व्हिसेस् डिमन (SSSD) आइडेंटिटि व ऑथेंटिकेशनकरीता केंद्रिय व्यवस्थापन लागू करतो. आइडेंटिटि व ऑथेंटिकेशन सर्व्हिसेस् सेंट्रलाइज केल्यामुळे आइडेंटिटिज्चे स्थानीय कॅशिंग सुरू होते, ज्यामुळे वापरकर्त्यांना सर्व्हरशी जोडणीमध्ये कुठे व्यत्यय आढळले ते ओळखण्यासाठी केला जातो. SSSD अनेक आइडेंटिटि व ऑथेंटिकेशन सर्व्हिसेस् करीता समर्थन पुरवतो, ज्यामध्ये: Red Hat Directory Server, Active Directory, OpenLDAP, 389, Kerberos व LDAP समाविष्टीत आहे. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये SSSD ला आवृत्ती 1.5 करीता सुधारित केले आहे, ज्यामध्ये खालील बग निवारण व वाढ पुरवले आहे:
  • Netgroups समर्थन
  • सुधारित ऑनलाइन/ऑफलाइन ओळख
  • शॅडो व authorizedService करीता समर्थनसह सुधारित LDAP ॲकसेस्-कंट्रोल प्रोव्हाइडर
  • सुधारित कॅशिंग व क्लिनअप लॉजिककरीता विविध स्किमॅटा
  • सुधारित DNS आधारित डिस्कवरि
  • स्वयं कर्बरोज तिकिट नूतनीकरण
  • कर्बरोज FAST प्रोटोकॉल सुरू करणे
  • पासवर्ड समाप्तिची उत्तम हाताळणी
  • LDAP खात्यांकरीता पासवर्ड गोंधळ

पुढील वाचन

वितरण पुस्तिका मध्ये विभाग समाविष्टीत आहे जे SSSD च्या प्रतिष्ठापन व संरचना विषयी वर्णन करते.
IPA
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये IPA तंत्र पूर्वदृष्य म्हणून समाविष्ट केले आहे. IPA एकीकृत सुरक्षा माहिती व्यवस्थापन पर्याय आहे जे Red Hat Enterprise Linux, Red Hat Directory Server, MIT Kerberos, व NTP ला एकत्र करते. वेब ब्राऊजर व आदेश ओळ संवाद पुरवले जाते, व त्याचे पुष्कळ प्रशासन साधने प्रशासकाला पटकन प्रतिष्ठापन, सेट अप, व and मध्यवर्ती ऑथेंटिकेशन आणि ओळख व्यवस्थेसाठी एक किंवा अधिक सर्व्हर्स्च्या नियंत्रनकरीता परवानगी देतो.

पुढील वाचन

एंटरप्राइज आइडेंटिटि मॅनेजमेंट गाईड मध्ये IPA तंत्र पूर्वदृष्यविषयी पुढील माहिती समाविष्टीत आहे.
Samba
Samba, कॉमन इंटरनेट फाइल सिस्टम (CIFS) प्रोटोकॉलचे ओपन सोअर्स लागूकरण आहे. ते Microsoft Windows, Linux, UNIX, व इतर कार्यप्रणालीच्या नेटवर्किंगकरीता परवानगी देतो, ज्यामुळे Windows-आधारित फाइल व छपाईयंत्र शेअर्स् करीता प्रवेश प्राप्त होतो. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये Samba ला आवृत्ती 3.5.6 करीता सुधारित केले आहे.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये CIFS माऊंटचा वापरतेवेळी, माऊंटकरीता संपूर्ण प्रवेशसाठी समान माऊंट श्रेय विना, Samba वापकर्त्याला स्वतःचे कर्बेरोज श्रेय वापरण्याची परवानगी देतो.
FreeRADIUS
FreeRADIUS एक इंटरनेट ओळख पटवण्याची डिमन आहे, जे RFC 2865 (व इतर) मध्ये व्याख्यीत RADIUS प्रोटोकॉल लागू करतो. तसेच नेटवर्क ॲक्सेस् सर्व्हर्सला (NAS पेटी) डायल-अप वापरकर्त्यांसाठी ओळख पटवण्यास परवानगी देतो. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये FreeRADIUS ला आवृत्ती 2.1.10 करीता सुधारित केले आहे.
कर्बरोज्
कर्बरोज् नेटवर्कवर ओळख पटवण्याची प्रणाली आहे जे वापरकर्ते व संगणकांना विश्वासर्ह तिसरे पक्षीय, KDC च्या मदतीने परस्पर ओळख पटवण्यास मदत पुरवते. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये, कर्बरोज् (krb5 संकुलमध्ये पुरवलेले) याला आवृत्ती 1.9 करीता सुधारित केले आहे.

6. सुरक्षा

OpenSCAP
OpenSCAP हे ओपन सोअर्स लाइब्ररिज्चा संच आहे जे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्टँडर्डस् अँड टेक्नोलॉजि (NIST) पासूनचे सेक्युरिटि कंटेंट ऑटोमेशन प्रोटोकॉल (SCAP) मानककरीता समर्थन पुरवते. OpenSCAP SCAP घटकांना समर्थन पुरवते:
  • कॉमन वुल्नेरबिलिटिज् अँड एक्सपोजर्स् (CVE)
  • कॉमन प्लॅटफॉर्म एन्युमरेशन (CPE)
  • कॉमन कॉन्फिगरेशन एन्युमरेशन (CCE)
  • कॉमन वुल्नेरबिलिटी स्कोरिंग सिस्टम् (CVSS)
  • ओपन वुल्नेरबिलिटी अँड असेस्मेंट लँगवेज (OVAL)
  • एक्सटेंसिबल कॉन्फिगरेशन चेकलिस्ट डिस्क्रिपशन फॉरमॅट (XCCDF)
याच्या व्यतिरिक्त, openSCAP संकुलमध्ये प्रणाली संरचनाविषयी SCAP रिपोर्टस् निर्माण करण्यासाठी ॲप्लिकेशन समाविष्टीत आहे. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये आत्ता openSCAP पूर्णतया समर्थीत संकुल आहे.
SPICE करीता स्मार्टकार्ड समर्थन
सिम्पल प्रोटोकॉल फॉर इंडिपेंडंट कम्प्युटिंग एन्वायर्नमेंट्स् (SPICE) हे वर्च्युअल वातावरणकरीता रचना केलेले दूरस्त डिस्पले प्रोटोकॉल आहे. स्थानीय प्रणाली किंवा सर्व्हरशी नेटवर्क प्रवेश असणाऱ्या कुठल्याहि प्रणालीपासून SPICE वापरकर्ते वर्च्युअलाइज्ड् डेस्कटॉप किंवा सर्व्हर पाहू शकतात. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये introduces support for SPICE प्रोटोकॉल मार्गे स्मार्टकार्ड पासत्रुकरीता समर्थन पुरवले आहे.

पुढील वाचन

सुरक्षा पुस्तिका वापरकर्त्यांना व प्रशासकांना वर्कस्टेशन्स् व सर्व्हर्संना स्थानीय व दुरस्थ अवैध प्रवेश, गैरवापर व सदोषीत क्रियांपासून सुरक्षीत करण्याची प्रक्रिया व पद्धती शिकण्यास मदत करते.

7. प्रतिष्ठापन

Emulex 10GbE PCI-E Gen2 व Chelsio T4 10GbE नेटवर्क ॲडॅप्टर्स् करीता Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये प्रतिष्ठापन व बूट समर्थन समाविष्ट केले आहे. याच्याव्यतिरिक्त, UEFI प्रणालीवरील 4KB सेक्टर आकारसह बूटिंग वॉल्यूम्स्करीता समर्थनसह GRUB बूटलोडरला सुधारित केले आहे.
Red Hat Enterprise Linux 6.1 मधील इंस्टॉलर असमर्थीत हार्डवेअर प्लॅटफॉर्म्स् ओळखतो व वापरकर्त्याला सूचना पुरवतो. प्रतिष्ठापन सुरू राहेल, परंतु खालील संदेश दाखवले जाते
हे हार्डवेअर (किंवा जोडणी) Red Hat द्वारे समर्थीत नाही. समर्थीत हार्डवेअरविषयी अधिक माहितीकरीता, कृपया http://www.redhat.com/hardware पहा.

iSCSI ॲडॅप्टर्स् करीता सुधारित समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.1 प्रतिष्ठापन व बूट वेळी iSCSI अडॅप्टर्स् करीता सुधारित समर्थन पुरवतो, ज्यात प्रतिष्ठापनवेळी iSCSI स्टोरेजकरीता प्रवेश श्रेय व पार्शिअल ऑफलोड iSCSI अडॅप्टर्स् (उ.दा. एम्यूलेक्स् टाइगर शार्क अडॅप्टर) करीता समर्थन समाविष्टीत आहे.
Red Hat Enterprise Linux 6 मध्ये iBFT मधील BIOS iSCSI सेटिंग्स्चे स्वयं-शोधचा वापर करून iSCSI वर प्रतिष्ठापनकरीता समर्थन पुरवले आहे. तरी, iBFT सेटिंग्स्ची पुनःसंरचना प्रतिष्ठापननंतर शक्य नाही. Red Hat enterprise Linux 6.1 मध्ये, TCP/IP सेटिंग्स् व iSCSI इनिशिएटर संरचना बूट वेळी iBFT सेटिंग्स् पासून गतिकरित्या संरचीत केले जाते.

8. कंपाईलर व साधने

सिस्टमटॅप
सिस्टमटॅप ट्रेसिंग व प्रोबिंग साधन आहे जे वापरकर्त्यांना कार्यप्रणालीवरील क्रियाचे तपशीलमध्ये अभ्यास व नियंत्रण करण्यास (विशेषतया, कर्नल) परवानगी देते. netstat, ps, top, व iostat प्रमाणे साधनांचे आऊटपुट पुरवते; तरी, सिस्टमटॅप ची रचना गोळा केलेल्या माहितीकरीता अधिक फिल्टरिंग व विश्लेषण पर्याय पुरवण्यासाठी केला आहे.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये सिस्टमटॅपला आवृत्ती 1.4 करीता सुधारित केले, खाली समाविष्टीत:
  • --remote USER@HOST सह रिमोट होस्ट स्क्रिप्टिंगची अल्फा आवृत्ती
  • निष्क्रीय यूजर प्रोब पॉईंट्स् करीता नियर झीरोचे ऑप्टिमाइजेशन
अधिक माहितीकरीता सिस्टमटॅप प्रकाशन टिपा पहा.
GNU प्रोजेक्ट डिबगर (GDB)
नियंत्रीत तऱ्हेने, व डाटाची छपाई करून GNU प्रोजेक्ट डिबगर (सहसा त्यांस GDB असे म्हटले जाते) C, C++, व इतर भाषामधील लिहले प्रोग्राम्स् डिबग करतो. Red Hat Enterprise Linux 6.1 मधील GDB ला आवृत्ती 7.2 करीता सुधारीत केले आहे, ज्यात बगनिवारण व गुणविशेष वाढ समाविष्ट आहेत, जसे कि पायथन स्क्रिप्टिंग गुणविशेष, व C++ डिबगिंगकरीता सुधारणा समाविष्टीत आहे.
परफॉर्मंस ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (PAPI)
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये परफॉर्मंस ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (PAPI) समाविष्टीत आहे. PAPI, हे आधुनिक माइक्रोप्रोसेसर्सवरील हार्डवेअर परफॉर्मंस काऊंटर्स् करीता क्रॉस-प्लॅटफॉर्म संवादांचे विवरण आहे. हे काऊंटर्स् लहान रेजिस्टर्स्चा संच म्हणून अस्तित्वात असतात जे घटनांची गणना करतात, जे प्रोसेसर फंक्शनशी संबंधित ठराविक घटना असतात. या घटनांना नियंत्रीत केल्यामुळे ॲप्लिकेशन परफॉर्मंस विश्लेषण व ट्युनिंगमध्ये असंख्या वापर होतो.
ओप्रोफाइल
ओप्रोफाइल Linux प्रणालींकरीता प्रणाली-भर प्रोफाइलर आहे. प्रोफाइलिंग पार्श्वभूमीत चालते व प्रोफाइल डाटा कुठल्याहि क्षणी गोळा करणे शक्य आहे. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये, ओप्रोफाइलला आवृत्ती 0.9.6-12 करीता सुधारित केले आहे, ज्यामुळे AMD फॅमिलि 12h/14h/15h प्रोसेसर्स् व Intel Westmere निर्देशीत घटनांकरीता समर्थन पुरवले जाते.
वालग्रिंड
वालग्रिंड प्रयोगिक फ्रेमवर्क आहे ज्याचा वापर डायनॅमिक विश्लेषण साधने निर्माण करण्यास केला जातो व ज्यामुळे ॲप्लिकेशन्स्ला तपशीलमध्ये प्रोफाइल करणे शक्य आहे. वालग्रिंड साधनांचा वापर सहसा स्वतः अनेक मेमरी व्यवस्थापन व थ्रेडिंग अडचणी शोधण्यास केला जातो. वालग्रिंड संचामध्ये आवश्यकता प्रमाणे नवीन प्रोफाइलिंग साधने बिल्ड करण्यासाठी परवानगी पुरवणारे साधने देखील समाविष्टीत आहे.
Red Hat Enterprise Linux 6.1 वालग्रिंड आवृत्ती 3.6.0 पुरवतो.
GNU कंपाइलर कलेकशन (GCC)
GNU कंपाईलर कल्लेक्शन (GCC) मध्ये, इतरांच्या व्यतिरीक्त, C, C++, व Java GNU कंपाइलर्स् व संबंधित लाइब्ररिज् समाविष्टीत आहे. Red Hat Enterprise Linux 6 मध्ये GCC ची आवृत्ती 4.4 समाविष्टीत आहे, ज्यात खालील गुणविशेष व वाढ समाविष्टीत आहे:
  • IBM z196 नवीन इंस्ट्रकशन समर्थन व ऑप्टिमाइजेशन्स्
  • IBM z10 prefetch इंस्ट्रकशन समर्थन व ऑप्टिमाइजेशन्स्
libdfp
libdfp लाइब्ररी Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये सुधारित केली आहे. libdfp डेसिमल फ्लोटिंग पॉईंट मॅथ लाइब्ररी आहे, व Power व s390x आर्किटेक्चर्स् वरील glibc मॅथ फंक्शन्स् करीता विकल्प आहे, व पूरक वाहिनींमध्ये उपलब्ध आहे.
एक्लिप्स्
एक्लिप्स् शक्तिशाली डेव्हलपमेंट वातावरण आहे जे डेव्हलपमेंट प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याला साधने पुरवते. त्यांस सोपे वापरकरीता एकमेव, संपूर्णत्या संयोजनाजोगी वापरकर्ता संवादमध्ये एकत्रीत केले जाते, ज्यामध्ये प्लग करण्याजोगी आर्किटेक्चर समाविष्टीत आहे जे विविध प्रकार द्वारे वाढकरीता परवानगी देतो.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये एक्लिप्स् डेव्हलपमेंट वातावरणाची सुधारित आवृत्ती उपलब्ध आहे, ज्यामध्ये खालील सुधारणा व वाढ समाविष्टीत आहे:
  • सर्व मुख्य प्लगईन्स् ताजे केले आहे, ज्यामध्ये वालग्रिंड व ओप्रोफाइल एकीकरण व C व C++ सह कार्य करण्यासाठी साधने समाविष्टीत आहे
  • मायलिन कार्य-केंद्रित रचना सुधारित केले आहे
  • वर्कस्पेस् अंतर्भुत माहितीकरीता सुधारित स्त्रोत फिल्टरिंग
  • C, C++ व Java कोड बेससह कार्य करतेवेळी कामगिरी सुधारणा
आईस्डटि
ओपनजेडिकेकरीता नवीन आईस्डटि वेब ओपन सोअर्स् वेब ब्राऊजर प्लगईन व वेबस्टार्ट लागूकरण.
  • ब्राऊजर्स् जसे कि फायरफॉक्स्ला वेब पानातील जावा ॲप्लेटस् लोड करण्यास परवानगी देतो
  • JNLP (जावा नेटवर्क लाँचिंग प्रोटोकॉल) फाइल्स् सुरू करण्यासाठी फ्रेमवर्क पुरवतो

9. क्लस्टरिंग

क्लसटर्स् एकापेक्षाजास्त संगणक (नोड्स्) आहेत जे एकाग्रपणे कार्य करतात व विश्वासर्हता, प्रमाणता, व क्रिटिकल प्रोडक्शन सर्व्हिसेस्ची उपलब्धता वाढवतात. कामगिरी, उच्च-उपलब्धता, लोड बॅलेंसिंग, व फाइल शेअरिंगकरीता विविध आवश्यकता पूर्ण करण्यासाठी Red Hat Enterprise Linux 6 चा वापर करून उच्च उपलब्धताचे वितरण विविध संरचनांमध्ये शक्य आहे.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये क्लस्टरिंगकरीता खालील मुख्य सुधारणा उपलब्ध आहेत
  • Rgmanager आत्ता निर्णायक व विना-निर्णायक स्त्रोतची संकल्पनाकरीता समर्थन पुरवतो
  • प्रणाली प्रशासके आत्ता आदेश ओळ साधनांचा वापर करून क्लस्टर संरचीत करणे व चालवणे शक्य आहे. हे गुणविशेष cluster.conf संरचना फाइल स्वहस्ते संपादित करण्यास किंवा ग्राफिकल संरचना साधन, Luci च्या वापरकरीता पर्याय पुरवते.
  • Red Hat Enterprise Linux KVM यजमानवरील Red Hat Enterprise Linux High Availability संपूर्णतया समर्थीत आहे
  • केंद्रिय क्लस्टर डिमन्स् व उप-भागांपासून व्यापक SNMP ट्रॅप समर्थन
  • quorum गमवल्यावर अगाऊ वॉचडॉग एकीकरण नोडला स्वतः रिबूट करायला परवानगी देतो

पुढील वाचन

क्लस्टर स्वीट् ओव्हरव्यू दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 6 करीता Red Hat क्लस्टर स्वीट्चे पूर्वावलोकन पुरवते. याच्या व्यतिरीक्त, उच्च उपलब्धता प्रशासन दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 6 करीता Red Hat क्लस्टर प्रणालीची संरचना व व्यवस्थापन ठरवतो.

10. आभासीकरण

vhost
नवीन यजमान कर्नल नेटवर्किंग बॅकएंड, vhost, Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये पूर्णतया समर्थीत गुणविशेष आहे. vhost सर्वोत्म त्रुपुट व युजरस्पेस् लागूकरणकरीता अवलंबन पुरवतो.
qcow2
qcow2 प्रतिमा स्वरूप आत्ता मेटाडाटच्या कॅशिंगकरीता समर्थन पुरवते. याच्या व्यतिरिक्त, बाहेरिल qcow2 प्रतिमेंचा वापर करून लाइव्ह स्नॅपशॉट्स् करीता समर्थन समाविष्ट केले आहे.
ब्लॉक I/O अवलंब सुधारणा
ioeventfd आत्ता उपलब्ध आहे, ब्लॉक I/O ची वेगवान सूचना पुरवतो.
कर्नल सेमपेज मर्जिंग (KSM)
Red Hat Enterprise Linux 6 मध्ये KVM हायपरवाइजर कर्नल सेमपेज मर्जिंग (KSM) समाविष्ट करतो, ज्यामुळे KVM अतिथींना समान मेमरी पेजेस् मिळून वापरायची परवानगी प्राप्त होते. पेज शेअरिंगमुळे मेमरी ड्युप्लिकेशन कमी होते, समान अतिथी कार्यप्रणालीसह यजमानला परिणामकारक पद्धतीने चालवण्यास परवानगी प्राप्त होते.
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये KSM ट्रांस्परेंट ह्युजपेज जागरूक आहे. KSM कडे ह्युजपेजेस् अंतर्गत सबपेजेस् स्कॅन करायची व एकत्र करणे शक्य असल्यावर विलग करण्याची क्षमता आहे.
याच्या व्यतिरिक्त, प्रति-VM आधारावर KSM सुर करणे आत्ता ताब्यात ठेववणे शक्य आहे.
PCI साधन वाटप सुधारणा
PCI संरचना स्पेस् प्रवेश सुधारित केले आहे, PCI साधनांचा मोठा संच अतिथी VMs ला साधन-वाटप म्हणून सुरू करण्यास समर्थीत करते.
KVMClock सुधारणा
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये, टाइम स्टॅम्प काऊंटर (TSC) समजुळवणी आत्ता अतिथी बूटअपवेळी किंवा यजमान CPU हॉट-प्लग केल्यावर स्वयं ओळखणे शक्य आहे. याच्याव्यतिरिक्त, लाइव्ह माइग्रेशन नंतर TSC सिंक्रोनाइजेशन फ्रिक्वेंसी सुस्थीत केले जाते.
QEMU मॉनिटर
याच्या व्यतिरिक्त, नवीन drive_del आदेश libvirt ला अतिथीपासून ब्लॉक साधन सुरक्षितपणे काढून टाकण्यास परवानगी देते.
सामान्य अद्ययावत व सुधारणा
  • qemu-kvm वरील कमाल डिस्पले रेजॉल्यूशन आत्ता 2560x1600 पिक्सेल्स् आहे
  • Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये एम्युलेटेड Intel HDA साऊंड कार्डला सर्व अतिथी समक्ष दाखवण्याची क्षमता समाविष्टीत आहे. Windows 7 ची 64-बिट आवृत्ती समाविष्टीत अनेक अतिथींकरीता ही सुधारणा स्थानीक साऊंड सपोर्ट सुरू करते
  • QEMU char डिव्हाइस फ्लो कंट्रोल सुरू केले आहे
  • win-virtio-blk ड्राइव्हरकरीता मेसेज सिग्नल्ड इन्टेर्रप्ट्स (MSI) लागू केले
  • अतिथीचे बूट साधने नीवडणे/क्रमवारीत लावण्यासाठी नवीन मानक संवाद
  • लाईव्ह स्थानांतरनकरीता स्थिरता सुधारणा
  • QEMU युजरस्पेस् स्टॅटिक ट्रेसिंग
  • वर्च्युअल डिस्क ऑनलाइन डायनॅमिक पुनःआकार गुणविशेष
  • क्रिटिकल साधने जसे कि gpu, pci बस कंट्रोलर, isa बस कंट्रोलरचे pci हॉट अनप्लग् स्वीकारू नका

11. एंटाइटलमेंट

Red Hat सबस्क्रिप्शन मॅनेजर व एंटाइटलमेंट्स् प्लॅटफॉर्म
गुणकारी संगणकाची आज्ञावली आणि पायाभूत मांडणी व्यवस्थेला संगणकाची आज्ञावली यादी सांभाळणे यांत्रिकता आवश्यकता असते — दोंही उत्पादनचे प्रकार व सॉफ्टवेअर प्रतिष्ठापीत केलेल्या प्रणालींची संख्या. Red Hat Enterprise Linux 6.1 च्या परस्पर, Red Hat नवीन एंटाइलटमेंट प्लॅटफॉर्मची ओळख करत आहे जे संघटनाकरीता सॉफ्टवेअर एंटाइटलमेंट व अधिक गुणकारी कंटेट डिलिवरी प्रणाली पुरवतो. स्थानीय प्रणालींवर, स्थानीय प्रणालीचे व्यवस्थापन व त्यावरील वाटप केलेल्या सबस्क्रिपशन्स् करीता नवीन Red Hat सबस्क्रिपशन मॅनेजर दोंही GUI व आदेश-ओळ साधने पुरवतो. सबस्क्रिपशन्स् हाताळण्यासाठी उत्तम पद्धती ग्राहकांना सॉफ्टवेअर सहत्वता व Red Hat उत्पादने प्रतिष्ठापीत करणे व सुधारित करणे आणखी सोपे करते.

पुढील वाचन

Red Hat Enterprise Linux 6.1 वितरण पुस्तिका मध्ये सबस्क्रिप्शन्स् व्यवस्थापीत करण्यासाठी माहिती समाविष्टीत आहे. याच्या व्यतिरिक्त, प्रतिष्ठापनवेळी नोंदणी व सबस्क्रिप्शन प्रक्रियाविषयी अगाऊ माहितीसाठी Red Hat Enterprise Linux 6.1 प्रतिष्ठापन पुस्तिका पहा.

12. सामान्य सुधारणा

ऑटेमेटेड बग रिपोर्टिंग टूल
Red Hat Enterprise Linux 6 मध्ये नवीन ऑटोमेटेड बग रिपोर्टिंग टूल (ABRT) समाविष्टीत आहे. ABRT सॉफ्टवेअर क्रॅशचे तपशील स्थानीय प्रणालीवर साठवतो, व Red Hat सपोर्टला अडचणी कळवण्यासाठी संवाद (दोंही ग्राफिकल व आदेश ओळ आधारीत) पुरवतो. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये, ABRT ला आवृत्ती 1.1.16 करीता सुधारित केले आहे. ही सुधारणा इतर बगनिवारण व गुणविशेष वाढ व्याप्तिच्या व्यतिरिक्त प्रगत ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) पुरवते.
openCryptoki
openCryptoki मध्ये IBM क्रिप्टोकार्ड्स् करीता लागू केलेली, PKCS#11 API ची आवृत्ती 2.11 समाविष्ट केली आहे. openCryptoki ला Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये सुधारित केले आहे, जे अनेक बगनिवारण व गुणविशेष वाढ पुरवते, ज्यात एकूण उत्तम कामगिरी समाविष्टीत आहे.
OpenLDAP
OpenLDAP , हे लाइटवेट डिरेक्ट्री ॲक्सेस् प्रोटोकॉल (LDAP) ॲप्लिकेशन्स् व डेव्हलपमेंट साधनांकरीता ओपन सोअर्स संच आहे. Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये OpenLDAP ला आवृत्ती 2.4.23 करीता सुधारीत केले आहे. OpenLDAP ची सुधारीत आवृत्ती नेटवर्क सेक्युरिटि सर्व्हिसेस् (NSS) क्रिप्टोग्राफिक लाइब्ररिज्चा वापर करते, तसेच OpenSSL ला बदलते.
TigerVNC
वर्च्युअल नेटवर्क कमप्युटिंग (VNC) करीता TigerVNC क्लाएंट व सर्व्हर सॉफ्टवेअर पुरवतो. VNC दूरस्त डिस्पले प्रणाली आहे, जे वापरकर्त्याला नेटवर्क जोडणीवरील कमप्युटिंग डेस्कटॉप एंवार्यनमेंट पुरवण्यास मदत पुरवते.TigerVNC ला आवृत्ती 1.1.0 करीता सुधारीत केले आहे, ज्यात अनेक बगनिर्धारण व सुधारित एंक्रिप्शन समर्थन समर्थन समाविष्टीत आहे.
tuned
tuned सिस्टम ट्युनिंग डिमन आहे जे प्रणाली घटके नियंत्रीत करतो व गतिकरित्या प्रणाली संरचना ट्युन करतो. ktune (सिस्टम ट्युनिंगकरीता स्टॅटिक पद्धती) चा वापर करून, tuned नियंत्रण व साधने ट्युन करू शकतो (उ.दा. हार्ड डिस्क ड्राइव्हस् व इथरनेट साधने). Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये, ट्युन्ड् ट्युनिंग प्रोफाइल्स् मध्ये आत्ता s390x आर्किटेक्चर्सकरीता समर्थन समाविष्टीत आहे.

A. आवृत्ती इतिहास

Revision History
Revision 1-25Wed Apr 20 2011Sandeep Shedmake
Release bumped to 25
Revision History
Revision 1-1Tue Apr 19 2011Sandeep Shedmake
Marathi Version of the Red Hat Enterprise Linux 6.1 Release Notes
Revision History
Revision 1-0Tue Mar 22 2011ऱ्यान लर्च्
Red Hat Enterprise Linux 6.1 प्रकाशन टिपांची पहिली आवृत्ती