Product SiteDocumentation Site

Red Hat Enterprise Linux 6

Release Notes

Red Hat Enterprise Linux 6.2 करीता प्रकाशन टिपा

Edition 2


Legal Notice

Copyright © 2011 Red Hat, Inc.
The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
 RaleighNC 27606-2072 USA
 Phone: +1 919 754 3700
 Phone: 888 733 4281
 Fax: +1 919 754 3701

Abstract
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 6.2 प्रकाशन टिपा दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 6 कार्यप्रणाली व या किर्कोळ प्रकाशनसाठी निर्देशीत सहभागी ऍप्लिकेशन्स्करीता केलेल्या मुख्य बदलची नोंदणी करतो. सर्व बदलांकरीता तपशील टिपा किर्कोळ प्रकाशनमध्ये टेकनिकल नोटस् येथे उपलब्ध आहेत.

प्रस्तावना
1. हार्डवेअर समर्थन
2. प्रतिष्ठापन
3. कर्नल
4. रिसोअर्स् व्यवस्थापन
5. डिव्हाइस ड्राइव्हर्स्
6. स्टोरेज
7. फाइल सिस्टम
8. नेटवर्किंग
9. प्रमाणीकरण व इंटरऑपरेबिलिटि
10. एंटाइटलमेंट
11. सेक्युरिटि, स्टँडर्डस् व सर्टिफिकेशन
12. कंपाईलर व साधने
13. क्लस्टरिंग
14. उच्च उपलब्धता
15. वर्च्युअलाइजेशन
16. ग्राफिक्स्
17. सामान्य सुधारणा
A. कम्पोनंटची आवृत्ती
B. आवृत्ती इतिहास

प्रस्तावना

प्रकाशन टिपा, Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व समावेषांचा उच्च स्तरिय अवलोकन पुरवते. Red Hat Enterprise Linux च्या 6.2 सुधारणाकरीता सर्व बदलांच्या तपशील दस्तऐवजीकरणकरीता, टेकनिकल टिपा पहा.

Note

Red Hat Enterprise Linux 6.2 प्रकाशन टिपांच्या सर्वात अलिकडील आवृत्तीकरीता ऑनलाइन प्रकाशन टिपा पहा.

Chapter 1. हार्डवेअर समर्थन

biosdevname
biosdevname संकुल यास आवृत्ती 0.3.8 करीता सुधारित केले आहे, --smbios--nopirq आदेश ओळ घटके पुरवले जातात. या आदेश ओळ घटकांसह, सोअर्स् कोड पॅचेस्, जे या कोडपाथ्स्ला काढून टाकते, त्यास बिल्ड प्रक्रियेतून काढून टाकणे शक्य आहे.

Chapter 2. प्रतिष्ठापन

प्रतिष्ठापनवेळी WWIDs चा वापर करून साधन ओळखण्याकरीता समर्थन
फाइबर चॅनल व सिरिअल अटॅच SCSI (SAS) साधने आत्ता अनअटेंडेड प्रतिष्ठापनकरीता वर्लड वाइड नेम (WWN) किंवा वर्ल्ड वाइड आइडेंटिफायर (WWID) तर्फे निर्देशीत केले जाते. WWN हे IEEE मानकचा भाग आहे ज्यामुळे स्टोरेज एरिया नेटवर्क्स् (SAN) व इतर प्रगत नेटवर्क मांडणींकरीता प्रतिष्ठापनवेळी स्टोरेज साधने ओळखणे सोपे होते. रिडंडंसि किंवा सुधारित कामगिरिचा वापर करून सर्व्हरकरीता एकापेक्षा जास्त फिजिकल मार्गांचा वापर करून स्टोरेज साधन जोडले असताना, या मार्गांकरीता साधन ओळखण्याकरीता WWN पुरेसे आहेत.
BIOS सह 2.2 TB पेक्षा मोठ्या विभाजनकरीता समर्थन
नवीन GUID पार्टिशन टेबल (GPT) करीता समर्थन पुरवणाऱ्या ठराविक BIOS मॉडल्स्चा वापर करून 2.2 TB पेक्षा जास्त हार्ड ड्राइव्ह विभाजनांपासून प्रतिष्ठापनांना आत्ता संरचीत करणे शक्य आहे. नवीन युनिफाइड एक्सटेंसिबल फर्मवेअर इंटरफेस (UEFI) याचा वापर न करणाऱ्या लेगसि BIOS लागूकरण पूर्वी प्रणालींवरील मोठे विभाजनांचा वापर करण्यापासून मर्यादित राहत असे.
इनिशिअल ramdisk फाइल
64-बिट PowerPC व 64-बिट IBM POWER सिरिज प्रणालींवरील इनिशिअल ramdisk फाइलचे initrd.img असे नामांकन झाले आहे. पूर्वीच्या प्रकाशनात, त्याचे नाव ramdisk.image.gz असे होते.
नेटवर्क प्रतिष्ठापनकरीता स्टॅटिक IPv6 पत्ता समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, नेटवर्क प्रतिष्ठापनकरीता ipv6 बूट पर्यायसाठी एक स्टॅटिक IPv6 पत्ता निर्देशीत करणे शक्य आहे. निर्देशीत पत्त्याचा प्रकार खालील स्वरूपाचे असायला हवे:
<IPv6 पत्ता>[/<प्रिफिक्स् लेंग्थ>]
वैध IPv6 पत्त्याचे उदाहरण म्हणजे 3ffe:ffff:0:1::1/128. प्रिफिक्स् वगळल्यास, 64 चे मूल्य गृहीत धरले जातील. ipv6 बूट पर्यायकरीता स्टॅटिक IPv6 पत्ता निर्देशीत करणे आधिपासूनच अस्तित्वातील dhcpauto घटकांशी संलग्न आहे ज्यास ipv6 बूट पर्यायकरीता निर्देशीत करणे शक्य आहे.

Chapter 3. कर्नल

Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये शिप केलेल्या कर्नलमध्ये अनेक बग फिक्सेस् व Linux कर्नलकरीता सुधारणा समाविष्टीत आहे. प्रत्येक निवारण केलेले बगच्या तपशीलकरीता व या प्रकाशनकरीता कर्नलमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक सुधारणाकरीता, Red Hat Enterprise Linux 6.2 बिटा टेकनिकल नोट्स्. चे कर्नल विभाग पहा
अगाऊ फाइल प्रणालीवरील kexec kdump समर्थन
Kdump (kexec-आधारित क्रॅश डम्पिंग पद्धती) आत्ता Red Hat Enterprise Linux 6 वरील खालील फाइल प्रणालीकरीता कोरचे डम्पिंगकरीता समर्थन पुरवतो:
  • Btrfs (लक्षात हि फाइल प्रणाली टेकनॉलजि प्रिव्युउ आहे)
  • ext4
  • XFS (टिप XFS लेअर प्रोडक्ट आहे व हे गुणविशेष सुरू करण्यासाठी प्रतिष्ठापीत व्हायला हवे)
pkgtemp यास coretemp सह एकत्र केले
pkgtemp घटकाला coretemp घटकासह एकत्र केले आहे. pkgtemp घटकाचा आत्ता वापर होत नाही. pkgtemp घटक तर्फे समर्थीत पूर्वीच्या गुणधर्मांना coretemp घटक आत्ता सर्व गुणधर्मांना समर्थन पुरवते.
coretemp पूर्वी फत्त प्रत्येक कोरकरीता तापमान पुरवत असे, तसेच pkgtemp घटक CPU संकुलाचे तापमान पुरवत असे. Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, coretemp घटक तुम्हाला कोर, अनकोर, व संकुलकरीता तापमान वाचण्यास परवानगी देत असे.
खालीलपैकी घटकांचा वापर करून कोणतेहि स्क्रिप्टस् सुधारित करणे शिफारसीय आहे.
SCSI ड्राइव्हर queuecommand फंक्शन्स्चे लॉकलेस् डिस्पॅचिंग
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, SCSI मिडलेयर queuecommand फंक्शन्स्च्या SCSI ड्राइव्हरकरीता वैकल्पिक लॉकलेस डिस्पॅचिंग समर्थन पुरवतो.
हे अपस्ट्रिम SCSI लॉक पुशडाऊन कमिटचे बॅकपोर्ट आहे. बॅकपोर्ट Red Hat Enterprise Linux 6.0 व Red Hat Enterprise Linux 6.1 सह बाइनरि कम्पॅटिबिलिटि जपवतो. बाइनरि कम्पॅटिबिलिटि जपवण्याकरीता समांतर अपस्ट्रिम SCSI लॉक पूशडाऊन पद्धतीपासून डाइवर्जंस आवश्यक आहे.
SCSI होस्ट बस लॉक विना ड्राइव्हर queuecommand डिस्पॅच केले जाईल असे निर्देशीत करण्यासाठी SCSI मिडलेयरकरीता scsi_host_template स्ट्रक्चरमधील पूर्वी नवापरलेल्या फ्लॅगचा वापर SCSI ड्राइव्हर्स् तर्फे केला जातो.
पूर्वनिर्धारित वर्तन म्हणजे ड्राइव्हर queuecommand डिस्पॅचवेळी Scsi_Host लॉक सुरू राहेल. scsi_host_alloc पूर्वी scsi_host_template लॉकलेस बिटला सेट केल्याने व Scsi_Host लॉक बंद करून ड्राइव्हर queuecommand फंक्शन डिस्पॅच केले जाईल. या घटनामध्ये, कोणत्याहि लॉक सुरक्षाकरीता जबाबदारि ड्राइव्हर queuecommand कोड पाथमध्ये पूश डाऊन केले जाते.
Red Hat Enterprise Linux 6.2 मधील लॉकलेस queuecommand याचा वापर करण्यासाठी SCSI ड्राइव्हर्स् यास सुधारित केले व खालील प्रमाणे सूचीत आहेत:
  • iscsi_iser
  • be2iscsi
  • bnx2fc
  • bnx2i
  • cxgb3i
  • cxgb4i
  • fcoe (सॉफ्टवेअर fcoe)
  • qla2xxx
  • qla4xxx
फाइबर चॅनल ओव्हर इथरनेट (FCoE) टार्गेट मोडकरीता समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये फाइबर चॅनल ओव्हर इथरनेट (FCoE) टार्गेट मोडकरीता, टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समर्थन समाविष्टीत आहे. हे कर्नल गुणधर्म targetadmin तर्फे संरचनाजोगी आहे, ज्यास fcoe-target-utils संकुलद्वारे पुरवले जाते. FCoE ची रचना डाटा सेंटर ब्रिजिंग (DCB) समर्थीत नेटवर्कवर वापर करण्यासाठी केली आहे. पुढील तपशील dcbtool(8)targetadmin(8) मॅन पृष्ठ अंतर्गत उपलब्ध आहे.

महत्वाचे

हे गुणधर्म नवीन SCSI टार्गेट लेअरचा वापर करतो, जे टेकनॉलजि प्रिव्युउ अंतर्गत येथे, व स्वतंत्रपणे FCoE टार्गेट सपोर्टपासून वापरणे टाळावे. या संकुलात AGPL परवाना समाविष्टीत आहे.
crashkernel=auto बूठ घटककरीता समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये, BZ#605786 सह, crashkernel=auto बूट घटकचा वापर होत नाही. तरी, Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, crashkernel=auto करीता समर्थन सर्व Red Hat Enterprise Linux 6 प्रणालींकरीता पुरवले जाते.
युजर स्पेस् मध्ये MD RAID करीता समर्थन
mdadmmdmon युटिलिटिज् यांना अरे ऑटो रिबिल्ड, RAID लेव्हल माइग्रेशन्स्, RAID 5 सपोर्ट मर्यादा, व SAS-SATA ड्राइव्ह रोमिंगकरीता समर्थन पुरवण्यासाठी सुधारित केले आहे.
फ्लश रिक्वेस्ट् मर्ज
फ्लश हळुवारपणे सुरू करणाऱ्या साधनांकरीता फ्लश विनंती एकत्र करण्यासाठी समर्थन पुरवण्याकरीता Red Hat Enterprise Linux 6.2 समर्थन पुरवते.
UV2 हब समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.2 UV2 हब समर्थन समाविष्ट करतो. UV2 हे UVhub चिप जे सध्याचे UV1 हब चिपचे सक्सर आहे. UV2 हे HARP हब चिपचा वापर करते जे सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. UV2 नवीन Intel सॉकेटस् करीता समर्थन पुरवते. कामगिरि सुधारित करण्यासाठी नवीन गुणधर्म पुरवतो. UV2 ची रचना SSI अंतर्गत 64 TB मेमरीकरीता समर्थन पुरवण्यासाठी केली आहे. वैकल्पिकरित्या, नोड कंट्रोलर MMRs यांना UV प्रणालींकरीता सुधारित केले आहे.
acpi_rsdp बूट घटक
kdump तर्फे ACPI RSDP पत्ता पुरवण्याकरीता Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये acpi_rsdp बूट घटक समाविष्टीत आहे, ज्यामुळे kdump कर्नल विना EFI (एक्सटेंसिबल फर्मवेअर इंटरफेस) बूट होऊ शकते.
QETH ड्राइव्हर सुधारणा
खालील सुधारणा QETH नेटवर्क साधन ड्राइव्हरकरीता समाविष्ट केले आहे:
  • af_iucv हाइपरसॉकेटस् ट्रांस्पोर्टकरीता समर्थन
  • फोर्स्ड् सिगनल अडॅप्टर निर्देशकरीता समर्थन
  • स्टोरेज ब्लॉक्स्च्या समकालिक डिलिवरिकरीता समर्थन
  • DASD ड्राइव्हरकरीता ECKD प्रवेशकसाठी समर्थन
  • नवीन इथरनेट प्रोटोकॉल ID if_ether मॉड्युलमध्ये समाविष्ट केले
CPACF अल्गोरिदम्स्
नवीन CPACF (क्रिप्टोग्राफिक फंक्शनकरीता CP असिस्ट) अल्गोरिदम्सकरीता समर्थन, IBM zEnterprise 196 तर्फे समर्थीत, यास समाविष्ट केले आहे. नवीन हार्डेवेअर ॲक्सिलरेटेड अल्गोरिदम्स् खालील प्रमाणे आहे:
  • AES करीता CTR मोड
  • DES व 3DES करीता CTR मोड
  • 128 व 256 बिटस् लांबिसह AES करीता XTS मोड
  • GCM मोड करीता GHASH मेसेज डाइजेस्ट
Red Hat Enterprise Linux 6.2 pci=realloc कर्नल घटकतर्फे कंडिश्नल रिसोअर्स्-रिअलोकेशनकरीता समर्थन पुरवतो. हे गुणधर्म विना रिग्रेशन्स् डायनॅमिक रिअलोकेट pci रिसोअर्स् समाविष्ट करण्यासाठी एक पर्याय पुरवतो. पूर्वनिर्धारितपणे डायनॅमिक रिअलोकेशन बंद करतो, परंतु pci=realloc कर्नल आदेशओळ घटकतर्फे सुरू करण्याची सुविधा समाविष्ट करतो.
PCI सुधारणा
डायनॅमिक रिअलोकेशन पूर्वनिर्धारितपणे बंद केले आहे. pci=realloc कर्नल आदेश ओळ घटकासह सुरू करणे शक्य आहे. या व्यतिरिक्त, PCI assign unassigned कॉलमध्ये मोठे रेंजेस् पुरवण्याकरीता ब्रिज रिसोअर्सना सुधारित केले आहे.
SMEP
Red Hat Enterprise Linux 6.2 कर्नलमध्ये SMEP (सुपरविजन मोड एक्जिक्युशन प्रोटेक्शन) सुरू करतो. SMEP एंफोर्समेंट पद्धती पुरवते, ज्यामुळे सुपरवाइजर मोडमध्ये असताना वापरकर्ता पृष्ठांमधून सुरू करण्याजोगी नसणारे घटक सेट करण्यासाठी प्रणालीला परवानगी देते. हि आवश्यकता त्यानंतर CPU तर्फे जबरनरित्या लागू केली जाते. हे गुणधर्म CPU सुपरवाइजर मोडमध्ये असताना युजरमोड पृष्ठांपासून सुरू होणाऱ्या सिस्टम कोडमधील हल्ले टाळू शकतो.
सुधारित वेगवान स्ट्रिंग सूचना
नवीन Intel प्लॅटफॉर्मकरीता सुधारित फास्ट स्ट्रिंग REP MOVSB/STORESB सूचना समर्थन समाविष्ट केले आहे.
USB 3.0 xHCI
स्पिल्ट-हब समर्थन समाविष्ट करण्यासाठी USB 3.0 xHCI होस्ट साइड ड्राइव्हरला सुधारित केले आहे, ज्यामुळे USB 3.0 रूटहब व USB 2.0 रूटहबची नोंदणी करून xHCI होस्ट कंट्रोलर बाहेरिल USB 3.0 हब म्हणून कार्य करते.
ACPI, APEI, व EINJ घटक समर्थन
ACPI, APEI, व EINJ घटक समर्थन आत्ता पूर्वनिर्धारितपणे समर्थीत आहे.
pstore
Red Hat Enterprise Linux 6.2 pstoreकरीता समर्थन समाविष्ट करतो — प्लॅटफॉर्म अवलंबीत पर्सिस्टंट स्टोरेजकरीता फाइल प्रणाली.
PCIe AER त्रुटी माहिती छपाई
हार्डवेअर एरर रिपोर्टिंगकरीता APEI (ACPI प्लॅटफॉर्म एरर इंटरफेस) आधारित printk करीता समर्थन समाविष्ट केले आहे, ज्यामुळे विविध स्रोत पासून त्रुटी एकत्र करून त्यांस प्रणाली कंसोलकरीता पाठवले जाते.
ioatdma ड्राइव्हर
Intel प्रोसेसर्स् करीता समर्थन पुरवण्यासाठी dma इंजिनसह ioatdma ड्राइव्हर (dma इंजिन ड्राइव्हर) यास सुधारित केले आहे.
8250 PCI सिरिअल ड्राइव्हर
Digi/IBM PCIe 2-port Async EIA-232 Adapter करीता समर्थन 8250 PCI सिरिअल ड्राइव्हरमध्ये समाविष्ट केले आहे. वैकल्पिकरित्या, Digi/IBM PCIe 2-port Async EIA-232 Adapter करीता EEH (एंहांस्ड् एरर हँडलिंग) समर्थन 8250 PCI सिरिअल ड्राइव्हरकरीता समाविष्ट केले आहे.
ARI समर्थन
ARI (ऑलटरनेटिव्ह राऊटिंग- ID इंटरपोलेशन) समर्थन, एक PCIe v2 गुणविशेष, Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये समाविष्ट केले आहे.
PCIe OBFF
Intel च्या सर्वात नवीन प्लॅटफॉर्मकरीता PCIe OBFF (ऑप्टिमाइज्ड् बफर फ्लश/फिल) सुरू करा/बंद करा समर्थन समाविष्ट केले आहे. इंटरप्टस् व मेमरी क्रियावरील साधनांकरीता व त्यास किमान पावर इम्पॅक्ट, उर्जा कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी OBFF साधने पुरवतो.
NVRAM करीता ऊप्स्/पॅनिक रिपोर्टस् गोळा करा
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, PowerPC आर्किटेक्चरवरिल NVRAM मधील dmesg बफरपासून कर्नल ऊप्स्/पॅनिक रिपोर्टस् प्राप्त करण्यासाठी कर्नलला सुरू केले जाते.
MXM ड्राइव्हर
MXM ड्राइव्हर, NVIDIA प्लॅटफॉर्म्स् वरील ग्राफिक्स स्विचिंग हाताळण्याकरीता जबाबदार, यास Red Hat Enterprise Linux 6.2 करीता बॅकपोर्ट केले आहे.
पेज कोअलेसिंग
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये पेज कोअलेसिंग, IBM Power सर्व्हर्स्वरील गुणविशेष जे लॉजिकल विभाजन अंतर्गत समान पेजेस् कोअलेसिंग करण्यासाठी परवानगी देते.
L3 कॅशे विभाजन
L3 कॅशे पार्टिशनिंगकरीता समर्थन नवीन AMD फॅमिलि CPU करीता पुरवले आहे.
thinkpad_acpi घटक
नवीन ThinkPad मॉडलकरीता समर्थन समाविष्ट करण्यासाठी thinkpad_acpi घटक सुधारित केले आहे.
C-State समर्थन
intel_idle मध्ये नवीन Intel प्रोसेसर C-State समर्थन समाविष्ट केले आहे.
IOMMU सावधानता
Red Hat Enterprise Linux 6.2 आत्ता AMD प्रणालीवर IOMMU (इंपुट/आऊटपुट मेमरि मॅनेजमेंट युनिट) करीता सावधानता दाखवतो.
बूटवेळी dmesg करीता लॉग करत आहे
बूटवेळी dmesg करीता बोर्ड, सिस्टम, व BIOS माहिती लॉग करत आहे.
IBM PowerPC समर्थन
cputable नोंदणी कर्नलमध्ये समावेश केले आहे, नवीन IBM PowerPC प्रोसेसर फॅमिलिकरीता समर्थन पुरवते.
VPHN
VPHN (वर्च्युअल प्रोसेसर होम नोड) गुणधर्म IBM System p वर बंद केले आहे.
नवीन Intel चिपसेट तर्फे समर्थीत ड्राइव्हर्स्
नवीन Intel चिपसेट तर्फे खालील ड्राइव्हर्स् समर्थीत आहे:
  • i2c-i801 SMBus ड्राइव्हर
  • ahci AHCI-मोड SATA
  • ata_piix IDE-मोड SATA ड्राइव्हर
  • TCO वॉचडॉग ड्राइव्हर
  • LPC कंट्रोलर ड्राइव्हर
exec-shield
IBM PowerPC प्रणालीवर, sysctl मध्ये किंवा /proc/sys/kernel/exec-shield घटकातील exec-shield मूल्य यापुढे जबरनपणे लागू केले जात नाही.
PPC64 वरील kdump
64-बिट PowerPC व 64-बिट IBM POWER सिरिज् प्रणालीवरील kdump करीता समर्थन पुरवण्याकरीता अगाऊ तपासणी व फिक्स् समाविष्ट केले आहे.
UV MMTIMER घटक
UV MMTIMER घटक (uv_mmtimer) यास SGI प्लॅटफॉर्म्सवर सुरू केले आहे. uv_mmtimer घटक UV प्रणालीच्या रिअल टाइल क्लॉककरीता प्रत्यक्ष वापरकर्ता प्रवेश स्वीकारतो ज्यास सर्व हब्स् करीता समरित्या जुळले जाते.
IB700 घटक
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये IB700 घटककरीता समर्थन समाविष्ट केले आहे
ओव्हरराइड PCIe AER मास्क रेजिस्टर्स्
aer_mask_override घटक समाविष्ट केले आहे, ज्यामुळे PCI साधनकरीता योग्य किंवा चुकिचे मास्क्स् खोडून पुनः चडवण्याकरीता मार्ग पुरवला जातो. मास्कमध्ये aer_inject() फंक्शनकरीता पुरवलेल्या स्थितीसह परस्पर बिट आढळते.
PPC64 वरील USB 3.0 होस्ट कंट्रोलर समर्थन
64-बिट PowerPC व 64-बिट IBM POWER Series प्रणालीकरीता USB 3.0 होस्ट कंट्रोलर समर्थन समाविष्ट केले आहे.
OOM किलर सुधारणा
सुधारित अपस्ट्रिम्ड् OOM (ऑऊट आफ मेमरि) किलर लागूकरण यास Red Hat Enterprise Linux 6.2 करीता बॅकपोर्ट केले आहे. सुधारणांमध्ये खालील समाविष्टीत आहे:
  • बाहेर पडण्याजोगी प्रोसे OOM किलरतर्फे पसंत केले जातात.
  • OOM kill प्रोसेस नीवडलेल्या प्रोसेसच्या चिल्डरनला देखील नष्ट करते.
  • forkbomb प्रोसेस्ला नष्ट करण्यासाठी ह्युरिस्टिक समाविष्ट केले आहे.
oom_score_adj /proc ट्युनेबल घटक प्रत्येक प्रोसेसच्या oom_score_adj वेरियेबमधील साठवलेले मूल्य समाविष्ट करते, ज्यास /proc तर्फे सुस्थीत करणे शक्य आहे. यामुळे प्रत्येक प्रोसेसच्या OOM किलरकरीता संलग्नताकरीता सुस्थीतपणा स्वीकारले जाते; -1000 करीता निश्चित केल्यास OOM kills संपूर्णपणे बंद केले जाईल, तसेच +1000 करीता सेट केल्यास प्रोसेसला OOMचे प्राइमरी kill टार्गेट म्हणून घोषीत केले जाईल.
नवीन लागूकरणविषयी अधिक माहितीकरीता, http://lwn.net/Articles/391222/ पहा.
zram ड्राइव्हर
Red Hat Enterprise Linux 6.2 सुधारित zram ड्राइव्हर पुरवते (जेनेरिक RAM आधारित कम्प्रेसेड् ब्लॉस साधने निर्माण करतो).
taskstat युटिलिटि
वापरण्याजोगी top युटिलिटिकरीता माइक्रोसेकंड CPU टाइम ग्रॅन्युलॅरिटि पुरवून Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, कर्नलमधील taskstat युटिलिटि (ASET कार्याची स्थिती छपाई करतो) सुधारित केली आहे.
perf युटिलिटि
Red Hat Enterprise Linux 6.2 कर्नलला v 3.1 करीता अपग्रेडसह perf युटिलिटिला अपस्ट्रिम आवृत्ती 3.1 करीता सुधारित करते. perf युटिलिटितर्फे पुरवलेल्या नवीन समर्थीत कर्नल गुणधर्मकरीता BZ#725524 पहा. perf युटिलिटिच्या सुधारित आवृत्तीमध्ये खालील समाविष्टीत आहे:
  • cgroup समर्थन समाविष्ट केले आहे
  • /proc/sys/kernel/kptr_restrict ची हाताळणी समाविष्ट केले आहे
  • अधिक cache-miss टक्केवारि प्रिंटआउटस् समाविष्ट केले आहे
  • आणखी CPU इव्हेंटस् दाखवण्यासाठी -d -d-d -d -d पर्याय समाविष्ट केले आहे
  • --sync/-S पर्याय समाविष्ट केले आहे
  • PERF_TYPE_RAW घटककरीता समर्थन समाविष्ट केले आहे
  • -f/--fields पर्यायविषयी अधिक दस्तऐवजीकरण समाविष्ट केले आहे
  • पायथन बाइडिंगकरीता समर्थन python-perf संकुल समाविष्ट केले आहे.
OProfile समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.2 नुकतेच Intel प्रोसेसरकरीता OProfile समर्थन समाविष्टीत करतो.
IRQ काऊंटिंग
इंटररप्ट रिक्वेस्टस् (IRQ) ची संख्या आत्ता सर्व irq ची बेरिज काऊंटर अंतर्गत मोजले जातात, /proc/stat फाइलचे लूकअपची कॉस्ट कमी करते.
शेड्युलिंग सुधारणा
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये शेड्युलिंग सुधारणा समाविष्ट केली आहे जेथे पुढील स्लीप व प्रिएम्प्ट पाथकरीता शेड्युलरला हिंट पुरवली जाते. हे हिंट/सुधारणा बहु कार्य गटातील बहु कार्यांचे वर्कलोड हाताळण्यास मदत करते.
ट्रांस्परेंट ह्युज पेजेस् सुधारणा
In Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, ट्रांस्परेंट ह्युज पेजेस् आत्ता कर्नलमधील विविध ठिकाणी समर्थीत आहे:
  • mremap, mincore, व mprotect चे सिस्टम कॉल्स्
  • /proc ट्युनजोगी घटके: /proc/<pid>/smaps/proc/vmstat
याव्यतिरिक्त, ट्रांस्परेंट ह्युज पेजेस् ठराविक कॉमपॅक्शन सुधारणा समाविष्ट करतो.
XTS AES256 स्वयं चाचणी
FIPS-140 आवश्यकता पूर्ण करण्यासाठी Red Hat Enterprise Linux 6.2 XTS (XEX-आधारित ट्विकड् कोडबूक) AES256 स्वयं चाचणी समाविष्ट करतो.
SELinux नेटफिल्टर पॅकेट ड्रॉप्स्
पूर्वी, पॅकेट ड्रॉप केल्यावर SELinux netfilter हुक्स् NF_DROP पुरवत असे. Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, netfilter हुक्समधील ड्रॉप तात्पुरते न होता नेहमीकरीताचे सदोषीत त्रुटी म्हणून घोषीत केले जाते असे. असे केल्याने, त्रुटी स्टॅकमध्ये पाठवले जाते, व काहिक ठिकाणी ॲप्लिकेशनला काहितरी चुकिचे होत आहे असे निर्देशीत होते.
LSM हूक
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, remount माऊंट पर्याय (mount -o remount) नवीन LSM हूककरीता पाठवले जातात.
UEFI प्रणालींकरीता पूर्वनिर्धारित मोड
फिजिकल अड्रेसिंग मोडमध्ये Red Hat Enterprise Linux 6.0 व 6.1 UEFI प्रणाली चालवण्याकरीता पूर्वनिर्धारित केले आहे. वर्च्युअल अड्रेसिंग मोडमध्ये Red Hat Enterprise Linux 6.2 UEFI प्रणाली चालवण्याकरीता पूर्वनिर्धारित केले आहे. physefi कर्नल घटक पुरवून पूर्वीचे वर्तन प्राप्त करणे शक्य आहे.
kdumping ओव्हर SSH करीता पूर्वनिर्धारित पद्धत
Red Hat Enterprise Linux 6 मध्ये, कोर ओव्हर SSH वरील kdumping करीता पूर्वनिर्धारित core_collector पद्धत scp पासून makedumpfile करीता सुधारित केली आहे, ज्यामुळे कोर फाइलचे आकार नेटवर्क लिंकवर प्रत बनवताना संकोचित होण्यास मदत पुरवते, ज्यामुळे प्रत बनवणे वेगवान होते.
जुणे vmcore पूर्णत्व आकार कोर फाइल आवश्यक असल्यास, /etc/kdump.conf फाइलमध्ये खालील निर्देशीत करा:
core_collector /usr/bin/scp

Chapter 4. रिसोअर्स् व्यवस्थापन

Cgroups CPU सिलिंग एंफोर्समेंट
Linux कर्नलमधील कमप्लिटलि फैर शेड्युलर (CFS) प्रमाणीत शेअर शेड्युलर आहे जे प्राधान्य/कार्याच्या वेट किंवा कार्य गटकरीता लागू केलेल्या शेअर्सवर आधारित CPU वेळ कार्य गट अंतर्गत विभाजीत करते. प्रणालीमध्ये अतिरिक्त रिकामे CPU सायकल्स् आढळल्यास, शेड्युलरच्या कार्य साठवण्याच्या दृष्टिकोणातून, CFS मध्ये कार्य गटाला अपेक्षीत CPU पेक्षा जास्त शेअर प्राप्त होऊ शकतात.
तरी खालीलप्रमाणे एंटरप्राइज स्थिती आढळतात, जेथे कार्य गटकरीता अपेक्षीतपेक्षा जास्त CPU शेअर देणे स्वीकार्य नाही:
पे-पर-युज
एकापेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देणाऱ्या एंटरप्राइज प्रणालींमध्ये, सर्व्हिस स्तरावर आधारित क्लाऊट सर्व्हिंस प्रोव्हाइडर्स्ला वर्च्युअल अतिथीला ठराविक CPU वेळचे वाटप करणे आवश्यक आहे.
सर्व्हिस स्तराची गॅरंटि
सर्व्हिस इंटरप्शन्स् विना प्रत्येक वर्च्युअल अतिथीकरीता CPU रिसोअर्स्ची टक्केवारीकरीता ग्राहकांची पसंती असते.
या स्थितीमध्ये, शेड्युलरला प्रिसेट मर्यादापेक्षा ओलांडल्यास कार्य गटाच्या CPU रिसोअर्सच्या वापरकरीता हार्ड स्टॉप निश्चित करावा लागतो. हे सहसा कार्य गटातर्फे वाटप केलेले संपूर्ण CPU वेळ वापरल्यास थ्रॉटल करून शक्य आहे.
वरील युज केसकरीता, Red Hat Enterprise Linux गुणधर्म रिपोर्टमध्ये cgroups CPU सिलिंग एंफोर्समेंटला खूप महत्वाचे समावेष समझले जाते. Xen, व VMware ESX शेड्युलरमध्ये मध्ये CPU सिलिंग एंकोर्समेंट क्रेडिट शेड्युलरतर्फे पुरवले जाते.
SMP प्रणालींवरील Cgroups CPU कंट्रोलर स्केलेबिलिटि सुधारणा
Red Hat Enterprise Linux 6 ने cgroups आऊट ऑफ द बॉक्स सुरू केले, व गेस्ट मॉडलकरीता libvirt cgroups निर्माण करते. मोठ्या SMP प्रणालींवर, cgroups च्या संख्यामध्ये वाढमुळे कामगिरि वाईट झाली आहे. तरी, Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, cgroups CPU स्केलेबिलिटि लक्षणीयरित्या सुधारित झाले आहे, एकाचवेळी कामगिरि कमी न होता एकापेक्षा जास्त cgroups निर्माण करणे व चालवणे शक्य आहे.
स्केलेबिलिटि सुधारणाच्या व्यतिरिक्त, एक /proc ट्युनेबल घटक, dd sysctl_sched_shares_window, समाविष्ट केले आहे, पूर्वनिर्धारित 10 ms करीता निश्चित केले आहे.
Cgroups I/O कंट्रोलर कामगिरि सुधारणा
I/O कंट्रोलर अंतर्गत लॉक्स्चा वापर कमी करण्यासाठी cgroups I/O कंट्रोलरची मांडणी सुधारित केली आहे, ज्यामुळे कामगिरि सुधारित होते. तसेच, I/O कंट्रोलर आत्ता cgroup आकडेवारीकरीता समर्थन पुरवते.
Cgroups मेमरी कंट्रोलर परफार्मंस सुधारणा
37% दराने page_cgroup अरेकरीता अलॉकेशन ओव्हरहेड कमी करून Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये मेमरि कंट्रोलरवरील मेमरि वापर ओव्हरहेड सुधारणा प्रस्तुत केली आहे. याव्यतिरिक्त, डायरेक्ट page_cgroup-to-page पॉईंटर काढून टाकले आहे, मेमरी कंट्रोलरचे परफॉर्मंस कंट्रोलर सुधारित करते.
CFQ group_isolation वेरियेबलकरीता पूर्वनिर्धारित मूल्य
CFQच्या group_isolation वेरियेबलकरीता पूर्वनिर्धारित 0 पासून 1 (/sys/block/<device>/queue/iosched/group_isoaltion) करीता बदलले आहे. अनेक चाचणी व असंख्य युजर रिपोर्टस् नंतर, पूर्वनिर्धारत 1 जपवणे अधिक उपयोगी आहे. 0 करीता सेट केल्यास, सर्व I/O क्युउज् root cgroup चा भाग बनतात व ॲप्लिकेशनचा भाग असणारे प्रत्यक्ष cgroup भागचा बनत नाही. अशा प्रकारे, ॲप्लिकेशन्स्करीता सर्व्हिस भेद आढळत नाही.

पुढील वाचन

रिसोअर्स् व्यवस्थापन व कंट्रोल ग्रूप्स्करीता अधिक माहितीसाठी, Red Hat Enterprise Linux 6.2 रिसोअर्स् मॅनेजमेंट गाइड पहा.

Chapter 5. डिव्हाइस ड्राइव्हर्स्

एम्युलेक्स lpfc ड्राइव्हर
एम्युलेक्स LPFC FC/FCoE ड्राइव्हरकरीता पूर्वनिर्धारित इंटररप्ट संरचना INT-X पासून MSI-X करीता बदलले आहे. हे पूर्वनिर्धारितपणे lpfc_use_msi मॉड्युल घटक (/sys/class/scsi_host/host#/lpfc_use_msiमध्ये) यास पूर्वीच्या 0 ऐवजी 2 करीता सेट केल्याने घोषीत होते. या बदलविषयी अधिक माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux 6.2 टेकनिकल नोट्स् पहा.
स्टोरेज ड्राइव्हर्स्
  • lpfc ड्राइव्हर करीता Emulex फाइबर चॅनल होस्ट बस अडॅप्टर्स्ला आवृत्ती 8.3.5.45.2p करीता सुधारित केले आहे.
  • mptfusion ड्राइव्हरला आवृत्ती 3.4.19 करीता सुधारित केले आहे.
  • ब्रॉडकॉम नेटएक्सस्ट्रिम II 57712 चिपकरीता bnx2fc ड्राइव्हरला आवृत्ती 1.0.4 करीता सुधारित केले आहे.
  • QLogic फाइबर चॅनल HBAs करीता qla2xxx ड्राइव्हरला आवृत्ती 8.03.07.05.06.2-k करीता सुधारित केले आहे.
  • megaraid ड्राइव्हरला आवृत्ती v5.38 करीता सुधारित केले आहे.
  • Areca RAID कंट्रोलर्सकरीता arcmsr ड्राइव्हर सुधारित केले आहे.
  • beiscsi ड्राइव्हरला आवृत्ती 2.103.298.0 करीता सुधारित केले आहे.
  • IBM Power Linux RAID SCSI HBAs करीता ipr ड्राइव्हरला आवृत्ती 2.5.2 करीता सुधारित केले आहे.
  • cciss ड्राइव्हर kdump अपयशकरीता फिक्स् पुरवण्यासाठी cciss ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • hpsa ड्राइव्हर kdump अपयशकरीता फिक्स् पुरवण्यासाठी hpsa ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • Broadcom NetXtreme II iSCSI करीता bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.0.3 करीता सुधारित केले आहे, ज्यामुळे सिंगल चिप 10G इथरनेट कंवर्जड् कंट्रोलर्स्च्या मल्टिपोर्ट 578xx फॅमिलिकरीता समर्थन पुरवले जाते.
  • mpt2sas ड्राइव्हरला आवृत्ती 09.101.00.00 करीता सुधारित केले आहे.
  • ब्रोकेड BFA FC SCSI ड्राइव्हरला (bfa ड्राइव्हर) आवृत्ती 2.3.2.4 करीता सुधारित केले आहे.
  • ServerEngines BladeEngine 2 Open iSCSI साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.160r करीता सुधारित केले आहे.
  • Intel IDE-R ATA समर्थन समाविष्ट करण्यासाठी ata_generic ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • isci ड्राइव्हरला आवृत्ती 2.6.40-rc करीता सुधारित केले आहे.
  • libfc, libfcoe, व fcoe ड्राइव्हर्सला सुधारित केले आहे.
  • qib ड्राइव्हर TrueScale HCAs सुधारित केले आहे.
  • libata घटकाला सुधारित एरर हाताळणी समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे.
  • md ड्राइव्हरला dm-raid लक्ष्य समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे, जे DM संवाद तर्फे सुधारित RAID क्षमता पुरवते. dm-raid कोड सध्या टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून घोषीत केले आहे.
  • डिव्हास मॅपर समर्थनला अपस्ट्रिम आवृत्ती 3.1+ करीता सुधारित केले आहे.
  • bsg/netlink संवादचा वापर करून qla4xxx करीता ॲप्लिकेशन समर्थन समाविष्ट केले आहे.
  • DIF/DIX कर्नल कोडला नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, ज्यामुळे scsi, block, व dm/md प्रभावीत होतात.
नेटवर्क ड्राइव्हर्स्
  • NetXen मल्टि पोर्ट (1/10) Gigabit नेटवर्क साधनांकरीता netxen ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.75 करीता सुधारित केले आहे.
  • vmxnet3 ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • bnx2x ड्राइव्हरला आवृत्ती v1.70 करीता सुधारित केले आहे.
  • ServerEngines BladeEngine2 10Gbps नेटवर्क साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.100u करीता सुधारित केले आहे.
  • ixgbevf ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.0-k करीता सुधारित केले आहे.
  • Chelsio Terminator4 10G युनिफाइड वायर नेटवर्क कंट्रोलर्स् करीता cxgb4 ड्राइव्हर सुधारित केले आहे.
  • Chelsio T3 फॅमिलिचे नेटवर्क साधणांकरीता cxgb3 ड्राइव्हर सुधारित केले आहे.
  • Intel 10 Gigabit PCI Express नेटवर्क साधनांकरीता ixgbe ड्राइव्हरला आवृत्ती 3.4.8-k करीता सुधारित केले आहे.
  • Intel PRO/1000 नेटवर्क साधनांकरीता e1000e ड्राइव्हर यास आवृत्ती 1.3.16-k करीता सुधारित केले आहे.
  • Intel PRO/1000 नेटवर्क साधणांकरीता e1000 ड्राइव्हर सुधारित केले आहे, ज्यामुळे Marvell Alaska M88E1118R PHY करीता समर्थन पुरवले जाते.
  • e100 ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • Cisco 10G इथरनेट साधनांकरीता enic ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.1.24 करीता सुधारित केले आहे.
  • igbvf ड्राइव्हरला आवृत्ती 2.0.0-k करीता सुधारित केले आहे.
  • Intel Gigabit इथरनेट अडॅप्टर्सकरीता igb ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • NetXtreme II 1 Gigabit Ethernet कंट्रोलर्सकरीता bnx2 ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.6+ करीता सुधारित केले आहे.
  • ब्रॉडकॉम टिगॉन3 इथरनेट साधनांकरीता tg3 ड्राइव्हरला आवृत्ती 3.119 करीता सुधारित केले आहे.
  • HP NC-Series QLogic 10 Gigabit Server Adapters करीता qlcnic ड्राइव्हरला आवृत्ती 5.0.16+ करीता सुधारित केले.
  • bna ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • Rx चेकसम ऑफलोडिंगसह संबंधित दोन बग्स्च्या निवारणकरीता r8169 ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • qlge ड्राइव्हरला आवृत्ती v1.00.00.29 करीता सुधारित केले आहे.
  • सिंगल-चिप 10G इथरनेट कंवर्जड् कंट्रोलर्स्च्या 578xx मल्टिपोर्ट फॅमिलिकरीता, VLAN समर्थन, व नवीन bnx2x फर्मवेअर संवादकरीता iSCSI व FCoE समर्थन समाविष्ट करण्यासाठी cnic ड्राइव्हर सुधारित केले आहे.
  • iwl6000iwlwifi यास EEPROM आवृत्ती 0x423 सह सुधारित केले आहे.
ग्राफिक्स् व मिश्र ड्राइव्हर्स्
  • radeon ड्राइव्हरला post-3.0 फिक्सेस् सह सुधारित केले आहे, बॅकपोर्टेड drm/agp कोड समाविष्टीत.
  • nouveaui915 ड्राइव्हर्स यांना सुधारित केले आहे, बॅकपोर्टेड drm/agp कोड समाविष्टीत.
  • नवीन KFIFO ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग संवादसह Ricoh मेमरि स्टिक ड्राइव्हर (R5C592) यास सुधारित केले आहे.
  • Digium TDM400P PCI कार्डला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी netjet ड्राइव्हर सुधारित केले आहे.
  • lm78 ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • Cintiq 21UX2, Intuos4 WL, व DTU-2231 अडॅप्टर कार्डस्करीता समर्थन पुरवण्यासाठी wacom ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • मल्टि-टच समर्थन समाविष्ट करण्यासाठी synaptics ड्राइव्हर सुधारित केले आहे.
  • नवीन चिपसेटस् व HDA ऑडिओ कोडेक्सकरीता समर्थन देण्याकरीता किंवा सुधारित करण्यासाठी ALSA HDA ऑडिओ ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • AMD प्लॅटफार्म्सकरीता नवीन Northbridge चिप समर्थीत करण्यासाठी edac ड्राइव्हरला सुधारित केले आहे.

Chapter 6. स्टोरेज

SAS VRAID फंक्शन्सकरीता iprutil समर्थन
iprutils संकुल ipr SCSI स्टोरेज डिव्हाइस ड्राइव्हरतर्फे समर्थीत SCSI साधने व्यवस्थापीत व संरचीत करण्यासाठी युटिलिटिज पुरवतात. iprutils संकुलला SAS VRAID फंकशन्स् करीता समर्थन पुरवण्यासाठी IBM POWER7 वरील नवीन 6 GB SAS अडॅप्टर्सकरीता सुधारित केले आहे.
LVM RAID समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, MD's RAID पर्सोनॅलिटिजकरीता समर्थन LVM मध्ये टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणू समाविष्ट केले आहे. खालील मूळ गुणधर्म उपलब्ध आहेत: निर्माण, दाखवा, पुनःनामांकन, वापर, व RAID लॉजिकल वॉल्युम्स् काढून टाकणे. ऑटेमेटेड फॉल्ट टॉलरंस अजूनही उपलब्ध नाही.
--type <segtype> घटक निर्देशीत करून RAID लॉजिकल वॉल्यूम्स् निर्माण करणे शक्य आहे. खालील काहिक उदाहरणे आहेत:
  • RAID1 अरे (हे LVM च्या mirror सेगमेंट प्रकारपेक्षा RAID1 चे वेगळे लागूकरण आहे) निर्माण करा:
    ~]# lvcreate --type raid1 -m 1 -L 1G -n my_lv my_vg
  • RAID5 अरे (3 स्ट्राइप्स् + 1 इमप्लिसिट पॅरिटि) निर्माण करा:
    ~]# lvcreate --type raid5 -i 3 -L 1G -n my_lv my_vg
  • RAID6 अरे (3 स्ट्राइप्स् + 2 इमप्लिसिट पॅरिटि) निर्माण करा:
    ~]# lvcreate --type raid6 -i 3 -L 1G -n my_lv my_vg
RDMA (iSER) इनिशिएटर व टार्गेटकरीता iSCSI एक्सटेंशन
iSER इनिशिएटर व टार्गेट आत्ता पूर्णतया समर्थीत आहे. Red Hat Enterprise Linux आत्ता iSCSI इनिशिएटर व प्रोडक्शन वातावरणात स्टोरेज सर्व्हर म्हणून कार्य करू शकते जे InfiniBand चा वापर करते व तेथे हाय थ्रुपुट व कमी लेटेंसि मुख्य आवश्यकता आहे.
LVM साधनांकरीता सुरू करायचे वेळामध्ये घट
LVM साधनांना आत्ता पटकन सुरू किंवा बंद करणे शक्य आहे. हे हाय-डेंसिटि वातावरणसह संलग्न आहे ज्यामध्ये अनेक LVM संरचना समाविष्टीत आहे. एक किंवा त्यापेक्षा लॉजिकल वॉल्यूम्स्चा वापर करणाऱ्या वर्च्युअल अतिथींकरीता समर्थन करणाऱ्या होस्टचे उदाहरण.

Chapter 7. फाइल सिस्टम

XFS स्केलेबिलिटि
XFS फाइल प्रणाली सध्या Red Hat Enterprise Linux 6 मध्ये समर्थीत आहे व बहुतांश मोठ्या फाइल्स् व एकाच यजमानवरील फाइल प्रणालीकरीता अनुकूल आहे. इंटिग्रेटेड बॅकअप व पुनःसाठवणे, डायरेक्ट I/O व फाइल प्रणालीचे ऑनलाइन रिसाइजिंग असे काहिक फायदे आहेत जे या फाइल प्रणाली तर्फे पुरवली जाते.
मेटाडेटा केंद्रित वर्कलोडस् हाताळण्याकरीता XFS लागूकरण सुधारित केले आहे. या प्रकारचे वर्कलोड प्रकारचे उदाहरण म्हणजे डिरेक्ट्रीतील हजारो लहान फाइल्सकरीता प्रवेश प्राप्त करणे. या सुधारणा पूर्वी, मेटाडेटा प्रोसेसिंगमुळे व्यत्यय येऊ शकते व परफार्मंस कमी होऊ शकते. या अडचणला सोडवण्याकरीता मेटाडाटाचे लॉगिंग विलंबीत करण्यासाठी पर्याय समाविष्ट केला आहे जे लक्षणीय कामगिरि सुधारणा पुरवते. मेटाडाटाच्या विलंबीत लॉगिंगमुळे परिणामस्वरूपी, या प्रकारच्या वर्कलोडस्करीता XFS ची कामगिरि ext4 सह अनुकूल आहे. विलंबीत लॉगिंगचा वापर करण्यासाठी पूर्वनिर्धारित माऊंट पर्याय यांना देखील सुधारित केले आहे.
पॅरेलल NFS
पॅरलल NFS (pNFS) NFS v4.1 मानकाचा भाग आहे जे क्लाएंटला प्रत्यक्ष व परस्पररित्या स्टोरेज साधनांकरीता प्रवेशसाठी परवानगी देते. pNFS आर्किटेक्चर स्केलेबिलिटि व वितरणकरीता NFS सर्व्हर्ससह संलग्न परफार्मंस अडचणी सोडवते.
pNFS 3 वेगळ्या स्टोरेज प्रोटोकॉल्स् किंवा मांडणीकरीता समर्थन पुरवते: फाइल्स्, ऑब्जेक्ट्स्, व ब्लॉक्स्. Red Hat Enterprise Linux 6.2 NFS क्लाएंट फाइल्स् लेआऊट प्रोटोकॉलकरीता समर्थन पुरवते.
pNFS फंक्शनॅलिटि स्वयंरित्या सुरू करण्यासाठी, खालील ओळसह /etc/modprobe.d/dist-nfsv41.conf फाइल निर्माण करा व प्रणालीला बूट करा:
alias nfs-layouttype4-1 nfs_layout_nfsv41_files
आत्ता -o minorversion=1 माऊंट पर्याय निर्देशीत केले असल्यास, व सर्व्हर pNFS-enabled असल्यास, pNFS क्लाएंट कोड स्वयंरित्या सुरू केले जाते.
हे गुणधर्म टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे. pNFS वरील अधिक माहितीकरीता, http://www.pnfs.com/ पहा.
CIFS मधील असिंक्रोनस राइट्स्
वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स्वरील रिमोट फाइल्स्करीता प्रवेश प्राप्त करण्यासाठी CIFS (कॉमन इंटरनेट फाइल सिस्टम) प्रोटोकॉल युनिफाइड पर्याय पुरवतो. CIFS क्लाएंट पारंपारिकरित्या फक्त सिंक्रोनस राइट्स्करीता परवानगी देतो. याचा अर्थ असा कि जोपर्यंत राइट्स् यशस्वीरित्या पूर्ण नाही होत तोपर्यंत क्लाएंट प्रोसेस नियंत्रीत राहणार नाही. यामुळे मोठ्या ट्रांजॅक्शन्स्करीता कामगिरिमध्ये कमी दर्जा आढळू शकतो. सिक्वेंशिअल राइट्स्करीता न थांबता CIFS क्लाएंटला डाटा परस्पररित्या लिहण्यासाठी सुधारित केले आहे. या बदलमुळे कामगिरिची सुधारणा 200% पर्यंत सुधारित झाली आहे.
CIFS NTLMSSP ओळख पटवणे
CIFS मध्ये NTLMSSP ओळखपटवणेकरीता समर्थन समाविष्ट केले आहे. या व्यतिरिक्त, CIFS आत्ता कर्नलचे क्रिप्टो API याचा वापर करते.
autofs4 घटक
autofs4 घटकाला कर्नल आवृत्ती 2.6.38 करीता सुधारित केले आहे.
ext3 व jbd करीता फिक्स्ड् ट्रेसपॉइंटस्
ext3jbd करीता फिक्स्ड् ट्रेस्पॉइंट समाविष्ट केले आहे.
सुपरब्लॉकमधील माऊंट पर्याय
ext4 मध्ये -o nobarrier माउंट पर्यायकरीता, व परस्पर युटिलिटिज् करीता: tune2fs, debugfs, libext2fs, समर्थन समाविष्ट केले आहे.

Chapter 8. नेटवर्किंग

मल्टि-मेसेज सेंड सिस्टम कॉल
Red Hat Enterprise Linux 6.2 मल्टि-मेसेज send सिस्टम कॉल प्रस्तुत करते जे Red Hat Enterprise Linux 6 मधील अस्तित्वातील recvmmsg सिस्टम कॉलची send आवृत्ती आहे.
सिस्टम कॉल sendmmsg सॉकेट API या प्रमाणे दिसते:
struct mmsghdr {
	struct msghdr	msg_hdr;
	unsigned	msg_len;
    };

ssize_t sendmmsg(int socket, struct mmsghdr *datagrams, int vlen, int flags);
ट्रांसमिट पॅकेट स्टिअरिंग (XPS)
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये मल्टिक्युउ साधनांकरीता ट्रांसमिट पॅकेट स्टीअरिंग (XPS) समाविष्टीत आहे. पॅकेट पाठवण्याकरीता संलग्न प्रोसेसरला टार्गेट करून XPS मध्ये मल्टिक्युऊ साधनांकरीता नेटवर्क पॅकेटस्चे आणखी उत्तम ट्रांसमिशन समाविष्टीत आहे. संरचनावर आधारित पॅकेट ट्रांसमिशनकरीता XPS ट्रांसमिट क्युउची नीवड सुरू करतो. हे Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये लागू केलेले रिसिव्ह-साइड क्षमता सारखेच आहे जे रिसिव्ह क्युउ (RPS) यावर आधारित प्रोसेसर नीवडकरीता परवानगी देते. XPS मुळे त्रुपुट 20% ते 30% असे सुधारित झाले आहे.
विनानोंदणी गटांकरीता ट्राफिक फ्लडिंग
पूर्वी, नोंदणी अशक्य गटकरीता ब्रिज फ्लडेड् पॅकेटस् सर्व पोर्टकरीता पाठवले जात असे. तरि, नोंदणी अशक्य गटकरीता ट्राफिक नेहमी आढळत असल्याने हे वर्तन अपेक्षित नाही. Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, ट्राफिक फत्त नोंदणी अशक्य गटकरीता व तेथून पोर्टकरीता, ज्यास राऊटर म्हणून चिन्ह लावले जाते, येथे पाठवले जाते . ठराविक पोर्टकरीता फ्लडिंग जबरनपणे लागू करण्यासाठी, पोर्टला राऊटर म्हणून चिन्ह लावा.
स्ट्रिम कंट्रोल ट्रांसमिशन प्रोटोकॉल (SCTP) मल्टिहोम समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.2 SCTP मल्टिहोमिंगकरीता समर्थन समाविष्ट करतो — एकापेक्षा जास्त IP पत्ता अंतर्गत नोडस् (म्हणजेच, मल्टि-होम नोडस्) पर्यंत पोहचणे.
UDP पॅकेट ड्रॉप इव्हेंटस्करीता ट्रेसपॉईंटस्
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, UDP पॅकेट ड्रॉप इव्हेंटस् करीता एकापेक्षा जास्त ट्रेसपॉईंट समाविष्ट केले आहे. UDP पॅकेटस् का वगळले याच्या विश्लेषणकरीता ट्रेसपॉईंट मार्ग पुरवते.
IPSet
एकापेक्षा जास्त IP पत्ते किंवा पोर्ट क्रमांक साठवण्याकरीता व iptablesच्या सहाय्याने कलेक्शन विरुद्ध जुळवण्याकरीता, कर्नलमध्ये IPSet गुणधर्म समाविष्ट केला आहे.
TCP इनिशिअल रिसिव्ह पटल पूर्वनिर्धारित
TCP इनिशिअल रिसिव्ह पटल पूर्वनिर्धारित 4 kB पासून 15 kB पर्यंत वाढवले आहेत. या वाढमुळे कोणतेहि डाटा (15 kB > पेलोड > 4 kB) सुरवातीच्य पटलात घट्ट बसते. 4 kB सेटिंग (IW3) सह, 4 kB पेक्षा कोणतेहि मोठे पेलोड एकापेक्षा जास्त ट्रांस्फरमध्ये विभाजीत करणे आवश्यक होते.
TCP इनिशिअल कंजशन पटल पूर्वनिर्धारित
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, TCP इनिशिअल कंजशन पटल पूर्वनिर्धारित आत्ता 10 करीता सेट केले आहे, RFC 5681 प्रमाणे. याव्यतिरिक्त, TCP व CCID-2 करीता सामान्य इनिशिअल विंडो कोड.
IPv6 वरील GSO समर्थन
IPv6 फॉरवर्ड पाथकरीता GSO (जेनेरिक सेगमेंटेशन ऑफलोड) समर्थन समाविष्ट केले आहे, GSO सुरू असल्यास यजमान/अतिथी संपर्ककरीता कामगिरि सुधारित केली जाते.
vios-proxy
वर्च्युअल अतिथीवरील क्लाएंट व हायपरवाइजर यजमानवरील सर्व्हर अंतर्गत जोडणीकरीता vios-proxy हे स्ट्रिम सॉकेट प्रॉक्सी आहे . संपर्क virtio-serial दुवा अंतर्गत होते. हे गुणधर्म टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये समाविष्ट केले आहे.

Chapter 9. प्रमाणीकरण व इंटरऑपरेबिलिटि

आइडेंटिटि मॅनेजमेंट
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये आइडेंटिटि मॅनेजमेंट क्षमता समाविष्टीत आहे जे युजर आइडेंटिटिज्चे सेंट्रल व्यवस्थापन, पॉलिसि-आधारित ॲकसेस् कंट्रोल व ऑथेंटिकेशन सर्व्हिसेस्करीता परवानगी देते. हे आइडेंटिटि मॅनेजमेंट सर्व्हिस, पूर्वी IPA म्हणून प्रचलित, ओपन सोअर्स् FreeIPA प्रकल्पावर आधारित आहे. हे सर्व्हिसेस् टेकनॉलजि म्हणून पूर्वीच्या Red Hat Enterprise Linux 6 प्रकाशनात प्रस्तुत केले आहे. या प्रकाशनसह, आइडेंटिटि मॅनेजमेंट पूर्णतया समर्थीत केले आहे.

पुढील वाचन

आइडेंटिटि मॅनेजमेंट गाइड आइडेंटिटि मॅनेजमेंट पर्यायविषयी, कार्य करण्याजोगी तंत्र, व वर्णन करण्यासाठी वापरण्याजोगी तंत्राची तपशील माहिती पुरवतो. दोंही क्लाएंट व सर्व्हर घटकांकरीता हाय-लेव्हल डिजाइन माहिती पुरवते.
स्मार्ट कार्डस् करीता PIV समर्थन
PIV (पर्सनल आइडेंटि वेरिफिकेशन) संवादसह स्मार्ट कार्डस्करीता Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये समर्थन पुरवले आहे. आत्ता FIPS 201 सहत्व PIV कार्डस्चा वापर करणे शक्य आहे ज्यामुळे डाटा सुरक्षित होते. कार्ड होल्डरकरीता प्रवेश प्रतिबंधित करून PIV कार्डस् डाटाची गोपणीयता राखतो. फक्त कार्ड धारकालाच संपादन करण्यास परवानगी देऊन डाटा एकाग्रताची देखील खात्री दिली जाते. माहितीची ऑथेंटिसिटि व डाटाचे नॉन-रेप्युडेशनची गॅरेंटि दिली जाते. PIV कार्डस्चा वापर U.S. Homeland Security Presidential Directive 12 (HSPC-12) तर्फे अनिवार्य आहे ज्याकरिता सर्व सरकारि IT प्रणालींकरीता प्रवेश स्वीकारण्यासाठी टेकनॉलजिचा वापर आवश्यक आहे.

Chapter 10. एंटाइटलमेंट

नवीन प्रतिष्ठापनकरीता सर्टिफिकेट आधारित RHN पूर्वनिर्धारित
Red Hat Enterprise Linux 6.1 मध्ये परिचीत नेक्स्ट जनरेशन सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट क्षमता आत्ता Red Hat Enterprise Linux 6.2 च्या नवीन प्रतिष्ठापनकरीता पूर्वनिर्धारित केली आहे. नवीन सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म Red Hat सबस्क्रिप्शन्स् व सॉफ्टवेअर सर्व्हिसेस् लवचिक, स्केलेबल व सुरक्षित पद्धतीने पुरवतो. नवीन Red Hat Enterprise Linux 6 प्रणाली प्रतिष्ठापीत करतेवेळी, वापरकर्त्याला x.509 प्रमाणपत्रे प्राप्त होते ज्यामध्ये कोणते Red Hat उत्पादने प्रतिष्ठापीत आहे व मशीन्स् कोणत्या सबस्क्रिप्शन्स्चा वापर करत आहे, याची माहिती पुरवली जाते. सबस्क्रिप्शन माहितीमध्ये सपोर्ट स्तर, वेळसमाप्ति दिनांक, Red Hat खाते क्रमांक, व Red Hat काँट्रॅक्ट क्रमांक समाविष्टीत आहे. या व्यतिरिक्त, एक x.509 प्रमाणपत्र मशीनला Red Hat कंटेंट डिलिवरि नेटवर्क (CDN) सह ओळख पटवण्यास परवानगी देतो. जागतिकरित्या वितरित Red Hat कंटेंट डिलिवरि नेटवर्क (CDN) याची रचना Red Hat प्रणालींचे आऊटेज आढळल्यावरहि कार्यरत राहण्यास केली आहे. नॉर्थ अमेरिकाच्या बाहेरिल वापरकर्त्याना सुधारित सुधारणा वेग व नवीन प्रणालीसह उपलब्धता आढळतील. RHN क्लासिक व RHN सॅटलाइट 5 उपलब्ध आहेत व संगणकीय नोंदणी व सुधारणा प्राप्त करण्यासाठी वैकल्पिक पर्याय म्हणून संपूर्णतया समर्थीत आहेत.
खंडित प्रणालींकरीता एंटाइटलमेंट प्राणपत्रे
Red Hat कस्टमर पोर्टल, Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये उपलब्ध नवीन फंक्शनालिटिसह, ग्राहकांना नोंदणी व खंडीत 25 मशीन्स् करीता सबस्क्राइब करण्यास परवानगी देते. या सुधारणापूर्वी, खंडित प्रणालींसह ग्राहकाला RHN संकेतस्थळापासून सबस्क्रिप्शन माहिती प्राप्त करणे व ट्रॅकिंग शक्य नव्हते. 25 पेक्षा जास्त खंडीत मशीन्स्करीता ग्राहकांना, अगाऊ किमतीला RHN सॅटेलाइट शिफारसीय पर्याय ठरते.
सबस्क्रिप्शनच्या पुनःनुतनीकरन नंतर प्रमाणपत्र स्वयं पुनःनिर्माण करणे
सबस्क्रिप्शनच्या पुनःनुतनीकरण नंतर आत्ता स्वयंरित्या नवीन एंटाइटलमेंट प्रमाणपत्र निर्माण करणे शक्य आहे. या सुधारणा पूर्वी, ग्राहकांना सॉफ्टवेअर सुधारणा व इतर सबस्क्रिप्शन सर्व्हिसेस् प्राप्त करण्यासाठी स्वहस्ते प्रमाणपत्र पुनःनिर्माण करायची आवश्यकता पडत असते. स्वयंरित्या प्रमाणपत्र पुनःनिर्माण केल्याने सर्व्हिस इंटरपश्न्स् कमी आढळत असे. प्रमाणपत्राचे स्वयं पुनःनिर्माण अपयशी झाल्यास वापरकर्त्यांना सूचीत केले जात असे. अधिक माहितीकरीता, https://www.redhat.com/rhel/renew/faqs/ पहा.
Red Hat सबस्क्रिप्शन मॅनेजर व सबस्क्रिप्शन सर्व्हिस
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये, प्रणालीची नोंदणी करताना, Red Hat सबस्क्रिप्शन मॅनेजर आत्ता पूर्वनिर्धारितरित्या वापरले जाते.

पुढील वाचन

सबस्क्रिप्शन्स् हाताळण्याकरीता पुढील माहिती Red Hat Enterprise Linux 6.2 वितरण पुस्तिका पहा.
Red Hat Enterprise Linux 6.2 प्रतिष्ठापन पुस्तिका मध्ये नोंदणीविषयी व firstbootkickstart विषयी माहिती समाविष्टीत आहे.

Chapter 11. सेक्युरिटि, स्टँडर्डस् व सर्टिफिकेशन

कॉमन क्राइटिरिया सर्टिफिकेशन
Red Hat Enterprise Linux 6.2 बिटा पर्यंत, Evaluation Assurance Level (EAL) 4+ येथे Red Hat Enterprise Linux 6 कॉमन क्राइटिरियाकरीता विश्लेषण अंतर्गत आहे. कॉमन क्राइटिरिया सुरक्षा आवश्यकता पुरवण्याचा मानक पर्याय पुरवतो व नियमावली निर्देशीत करते ज्यामुळे उत्पादनांचे विश्लेषण शक्य होते.
FIPS-140 तपासणी
Red Hat Enterprise Linux 6.2 बिटापर्यंत, FIPS-140 सर्टिफिकेशनकरीता Red Hat Enterprise Linux 6 क्रिप्टोग्राफिक घटके विश्लेषण अंतर्गत आहे. FIPS-140 हे U.S. सरकार सुरक्षा मानक आहे ज्याचा वापर क्रिप्टोग्राफिक घटकांना मान्यता देण्याकरीता केला जातो. Red Hat Enterprise Linux आत्ता सर्व सरकारी एजंसिज् तर्फे क्रिप्टोग्राफिक घटकांच्या स्विकार्य वापरकरीता U.S. फेडेरल गोवर्न्मेंट तर्फे आवश्यक रेग्युलेटरि पूर्ण करते.
विश्वासर्ह बूट
Red Hat Enterprise Linux 6.2 includes Intel Trusted Boot, a trusted boot mechanism (provided by the tboot package). Trusted boot is an install-time optional component that allows for Intel's Trusted Execution Technology (TXT) to perform a measured and verified launch of the operating system kernel. Trusted boot is supported on both Intel x86 and Intel 64/AMD64 architectures.

Chapter 12. कंपाईलर व साधने

SystemTap
SystemTap हे ट्रेसिंग व प्रोबिंग साधन आहे जे वापरकर्त्यांना कार्य प्रणालीचा अभ्यास व क्रिया नियंत्रीत करण्यासाठी तपशीलमध्ये सोय पुरवते (विशेषतया, कर्नल). netstat, ps, top, व iostat साधनांच्या आऊटपुट प्रमाणेच माहिती पुरवली जाते; तरी, SystemTap ची रचना अधिक फिल्टरिंग व गोळा केलेल्या माहितीकरीता विश्लेषण पर्याय पुरवण्यासाठी केली आहे.
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये SystemTap यास आवृत्ती 1.6 करीता सुधारित केले आहे, खालील पुरवते:
  • नावामध्ये हायफेन ("-") सह कर्नल घटके, जसे कि i2c-core आत्ता योग्यरित्या हाताळले जातात.
  • प्रोब घटके वाचण्याकरीता process.mark आत्ता $$parms यास समर्थन पुरवते.
  • SystemTap compile-serverclient याचे सुधारित व सोपे कार्य:
    • सुधारित कामगिरिकरीता compile-server स्क्रिप्ट बिल्ड परिणाम कॅश करू शकते.
    • compile-serverclient एक्सचेंज आवृत्ती माहितीकरीता संपर्क करते तसेच कम्युनिकेशन प्रोटोकॉल परस्पररित्या सुस्थीत करते व सर्व्हरचे सर्वात नवीन आवृत्तीचा वापर करते.
    • वापर नसलेल्या साधने काढून टाकणे: stap-client, stap-authorize-server-cert, stap-authorize-signing-cert, stap-find-or-start-server, व stap-find-servers.
  • रिमोट एक्जिक्युशनकरीता, --remote USER@HOST फंक्शनालिटि आत्ता एकापेक्षा जास्तवेळी निर्देशीत करणे शक्य आहे व वेगळ्या कर्नल व आर्किटेक्चर संरचनाकरीता स्वयंरित्या स्क्रिप्ट बिल्ड करतो, व त्यास सर्व नाव दिलेल्या मशीन्स्वर एकदा चालवतो.
  • staprun युटिलिटि आत्ता एकाच स्क्रिप्टला त्याचक्षणी एकापेक्षा जास्तवेळी चालवण्यास परवानगी देतो.

Chapter 13. क्लस्टरिंग

डायनॅमिक स्किमा निर्माण
Red Hat Enterprise Linux हाय अव्हेलेबिलिटि ॲड-ऑन पसंतीचे रिसोअर्स् व फेंस एजंटस् प्लग करण्यासाठी डायनॅमिक स्किमा जनरेशनचा परिचय वापरकर्त्यांसाठी बरपुर सोय पुरवतो, व एजंटस् विरुद्ध /etc/cluster.conf संरचना फाइल वैध करण्याची शक्यता जपवून ठेवतो. पसंतीचे एजंटस् योग्य मेटाडाटा आऊटपुट पुरवतील व सर्व क्लस्टर नोडस्वर एजंट्स् प्रतिष्ठापीत असावेत अशी सक्त आवश्यकता आहे.
GFS2 वरील वरील क्लस्टर्ड साम्बा
क्लस्टर्ड वातावरणात साम्बाकरीता समर्थन आत्ता पूर्णतया Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये समर्थीत आहे. साम्बा क्लस्टरिंग क्लस्टर्ड फाइल प्रणालीवर व सर्व नोडस्वर शेअर्ड् नोड्स्वर आधारित आहे. Red Hat Enterprise Linux संदर्भात, Samba क्लस्टरिंगला GFS2 सह नेटिव्ह शेअर्ड स्टोरेज फाइल प्रणाली अंतर्गत कार्य करण्यासाठी संरचीत केले आहे.
क्लस्टरमध्ये एकापेक्षा जास्त फिजिकल होस्ट स्पॅन करण्यासाठी क्लस्टर्ड साम्बा (अधिक विशेषतया CTDB) मेटाडाटाकरीता सुविधा पुरवतो. नोड अपयशी झाल्यास CTDB स्वयंतरित्या नोड-निर्देशीत डाटाबेसेस् पुनःप्राप्त व दुरूस्त करेल. हाय अव्हेलेबिलिटि गुणधर्म जसे कि नोड मॉनिटरिंग व फेलओव्हर देखील पुरवले जातात.
स्टँडअलोन Corosync करिता रिडंडंट रिंगसाठी समर्थन
टेकनॉलजि प्रिव्युउअंतर्गत ऑटोरिकव्हरि गुणधर्मसह Red Hat Enterprise Linux 6.2 रिडंडंट रिंगकरीता समर्थन पुरवतो. या टेकनॉलजि प्रिव्युउसह संबंधित परिचित अडचणींच्या सूचीकरीता टेकनिकल नोटस् पहा.
corosync-cpgtool
corosync-cpgtool आत्ता ड्युअल रिंग संरचना अंतर्गत दोंही इंटरफेस निर्देशीत करतो. हे गुणधर्म टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे.
/etc/cluster.conf मध्ये rgmanager बंद करत आहे
pacemaker, rgmanager तर्फे वापरण्याजोगी परिणामस्वरूपी /etc/cluster.conf संरचना फाइलला बंद करा. असे न करण्याचे भय जास्त आहे; यशस्वी रूपांतरनंतर, rgmanagerpacemaker यास एकाच यजमानवर सुरू करणे शक्य आहे, समान स्रोत व्यवस्थापीत करणे शक्य आहे.
परिणामस्वरूपी, Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये गुणविशेष (टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून) समाविष्टीत आहे जे खालील आवश्यकता जबरनरित्या लागू करते:
  • /etc/cluster.conf मध्ये <rm disabled="1"> फ्लॅग आढळल्यास rgmanager ने सुरू करण्यास टाळायला हवे.
  • पुनःसंरचनावेळी /etc/cluster.conf अंतर्गत <rm disabled="1"> फ्लॅग आढळल्यास rgmanager ने कोणतेहि स्रोत थांबवून बाहेर पडायचे.

Chapter 14. उच्च उपलब्धता

हाय अव्हेलेबिलिटि ॲड ऑनवरील XFS
Red Hat Enterprise Linux 6.2 हाय अव्हेलेबिलिटि ॲड ऑनसह XFS चा फाइल सिस्टम रिसोअर्स् म्हणून वापर आत्ता पूर्णपणे समर्थीत आहे.
VMWare करीता HA समर्थन
VMWare आधारित अतिथी अंतर्गत चालणारे ॲप्लिकेशन्स् आत्ता हाय अव्हलेबिलिलिटिकरीता संरचीत करणे शक्य आहे. यामध्ये GFS2 शेअर्ड् स्टोरेज फाइल प्रणालीच्या वापरकरीता संपूर्णतया समर्थन समाविष्टीत आहे. नवीन SOAP-आधारित फेंस अजेंट समाविष्ट केले आहे ज्यास आवश्यक असल्यास अतिथींना फेंस करायची क्षमता आहे.
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह UI सुधारणा
Luci, क्लस्टर्स् संरचीत करण्यासाठी वेब-आधारित ॲडमिनिस्ट्रेटिव्ह UI यास खालील समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे:
  • रोल-आधारित ॲक्सेस कंट्रोल (RBAC): ठराविक क्लस्टर कार्यांकरीता प्रवेश प्राप्त करण्यासाठी युजर क्लासेस् निर्देशीत करून फाइन्ड् गैन्ड् ॲक्सेस स्तर सुरू करतो.
  • क्लस्टरमध्ये डिस्ट्रक्टिव्ह कार्यांकरीता प्रतिसाद वेळ सुधारित करतो.
UDP-युनिकास्टकरीता समर्थन
क्लस्टर ट्रांस्पोर्टकरीता IP मल्टिकास्टिंग एकमात्र समर्थीत पर्याय आहे. IP मल्टिकास्टिंग संरचनाकरीता क्लिष्ट आहे व बहुतांशवेळी नेटवर्क स्विचेस् पुनःसंरचीत करायची आवश्यकता लागते. याविरूद्ध UDP-युनिकास्ट सोपे पद्धत पुरवते व क्लस्टर प्रशासनकरीता प्रसिद्ध प्रोटोकॉल आहे. UDP-युनिकास्ट, प्रारंभिकरित्या टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून प्रकाशीत केले, आत्ता संपूर्णतया समर्थीत आहे.
fence_scsi सह वॉचडॉग एकाग्रता
Linux मध्ये उपलब्ध वॉचडॉग सर्वसाधारण टाइमर सर्व्हिस आहे ज्याचा वापर सिस्टम रिसोअर्सकरीता वारंवार होतो. फेंस एजंटस्ला आत्ता वॉचडॉगसह एकाग्र केले आहे ज्यामुळे fence_scsi चा वापर करून फेंस केले असल्यास वॉचडॉग सर्व्हिस नोडला पुनःबूट करू शकते. यामुळे fence_scsi याचा वापर करून नोडला पुनःबूट करण्यासाठी स्वहस्ते व्यत्ययची आवश्यकता टळते .

Chapter 15. वर्च्युअलाइजेशन

KVM प्रोसेसर पर्फामंस सुधारणा
वर्च्युअल CPU टाइमस्लाइस शेअरिंग
वर्च्युअल CPU टाइमस्लाइस शेअरिंग Linux शेड्युलर लेव्हलकरीता परफार्मंस सुधारणा गुणधर्म आहे, जेथे वर्च्युअल CPU ला स्पिन केल्याने उर्वरित टाइमस्लाइस CPU यिल्ड करण्यापूर्वी इतर वर्च्युअल CPU करीता प्रदान केले जाते. हे गुणधर्म SMP प्रणालीतील लॉक होल्डर प्रिएम्शन समस्या सोडवते, ज्यामुळे वर्च्युअल CPU ची कामगिरि प्रभावीत होते. हे गुणधर्म मल्टि-प्रोसेसर अतिथींमध्ये स्थीर कामगिरि पुरवते. हे गुणधर्म दोंही Intel व AMD प्रोसेसर्स् यावर समर्थीत आहे, व त्यास Intel प्रोसेसर्स् वरील पॉज लूप एक्जिटिंग (PLE), व AMD प्रोसेसर्स्वरील पॉज फिल्टर असे म्हटले जाते.
KVM नेटवर्क कामगिरि सुधारणा
वर्च्युअलाइजेश व क्लाऊड आधारित उत्पादने व पर्ययकरीता KVM नेटवर्क कामगिरि गंभीर आवश्यकता आहे. टप्याने KVM नेटवर्क पॅरा-वर्च्युअलाइज्ड् ड्राइव्हर कामगिरि सुधारित करण्यासाठी Red Hat Enterprise Linux 6.2 असंख्य नेटवर्क कामगिरि सुधारणा पुरवते.
सुधारित स्मॉल मेसेज KVM कामगिरि
स्मॉल मेसेजेस् (< 4K) निर्माण करणारे नेटवर्किंग वर्कलोडस् पूर्ण करण्यासाठी Red Hat Enterprise Linux 6.2 KVM स्मॉल मेसेज परफॉर्मंस सुधारित करतो.
KVM नेटवर्क ड्राइव्हर्समधील वायर स्पीड आवश्यकता
वर्च्युअलाइजेशन व क्लाउड उत्पादने जे नेटवर्किंग वर्क लोडस् चालवतात, त्यास वायर स्पीड्स् चालवणे आवश्यक आहे. Red Hat Enterprise Linux 6.1 पर्यंत, कमी CPU वापरसह 10 GB Ethernet NIC वर वायर स्पीडकरीता पोहचण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे PCI साधन असाइनमेंट (पासथ्रु), जे मेमरि ओव्हरकमिट व अतिथी माइग्रेशन सारख्या गुणधर्मांना मर्यादित ठेवते
हाय परफार्मंस आवश्यक असल्यास macvtap/vhost झिरो-कॉपि क्षमता वापरकर्त्याला गुणधर्म वापरण्यास परवागनी देतो. हे गुणधर्म VEPA युज केस अंतर्गत कोणत्याहि Red Hat Enterprise Linux 6.x अतिथीकरीता कामगिरि सुधारित करते. हे गुणधर्म टेकनॉलजि प्रिव्युऊ म्हणून प्रस्तुत केले जाते.
KVM नेटवर्क ड्राइव्हर्सकरीता UDP चेकसम ऑप्टिमाइजेशन
NICs तर्फे होस्ट केले असल्यास UDP चेकसम ऑप्टिमाइजेशन अतिथीकरीता चेकसम वैधकरण्याची आवश्यकता टाळतो. हे गुणधर्म Red Hat Enterprise Linux 6.2 अतिथी व यजमानसह 10 GB इथरनेट कार्डसहवरील एक्सटर्नल ते अतिथीकरीता UDP चा वेग वाढवतो. UDP चेकसम ऑप्टिमाइजेशन virtio-net ड्राइव्हर अंतर्गत लागू केले जातात.
यजमान अतिथीपेक्षा हळु असल्यास सुधारित I/O पाथ कामगिरि
Red Hat Enterprise Linux 6.2 KVM नेटवर्क ड्राइव्हरमध्ये सुधारित I/O पाथ परफार्मंस, कमी वर्च्युअल मशीन एक्जीट्स् व इंटरप्टससह, ज्यामुळे डाटा डिलिवरि वेगवान होते. या सुधारणामुळे हळु यजमानवर वेगवान अतिथी चालवणे शक्य आहे, विना परफार्मंस पेनलिटि लागता. हि सुधारणा विस्तारित virtio रिंग स्ट्रक्चर, व virtiovhost-net अंतर्गत इव्हेंट इंडेक्स् समर्थनतर्फे प्राप्त केली जाते.
KVM सिस्टम्स् मॅनेजमेंट व युजेबिलिटि सुधारणा
SNMP तर्फे सिस्टम मॉनिटरिंग
हे गुणधर्म स्थीर तंत्रकरीता KVM समर्थन पुरवते ज्याचा वापर आधिपासूनच बेअर मेटल प्रणालीसह केला जातो. SNMP नियंत्रणकरीता मानक आहे व अधिक योग्यपणे समझले जाते तसेच कम्प्युटेशनलि सक्षम आहे. Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये SNMP तर्फे सिस्टम मॉनिटरिंग KVM यजमानला SNMP ट्रॅप्स पाठवण्यास परवागनी देते ज्यामुळे हायपरवाइजर इव्हेंटस् यांना SNMP प्रोटोकॉलच्या सहाय्याने वापरकर्त्यासह संपर्क करणे शक्य आहे. नवीन संकुल: libvirt-snmp यास समावेश करून हे गुणधर्म पुरवले जाते. या गुणधर्माला टेकनॉलजि प्रिव्युऊ म्हणून प्रस्तुत केले आहे.
सुधारित अतिथी डिबगिंग क्षमता
डाटा सेंटर्स् वर्च्युअलाइज करणारे वापरकर्त्यांना अतिथी OS खंडित झाल्यावर डिबगिंगकरीता मार्ग लागतो व क्रॅश डम्प सुरू करणे आवश्यक आहे. फिजिकल सिस्टम्ससह दोन पद्धतींचा सर्वात जास्त वापर केला जातो:
  • अतिथी अंतर्गत नॉन मास्केबल इंटरप्ट (NMI) सुरू करत आहे
  • अतिथीकरीता SysRq क्रम पाठवत आहे
KVM कंसोलसह या क्षमता प्रत्यक्षरित्या पुरवले असल्यास, अनेक libvirt API व virsh च्या सहाय्याने वापरकर्ते KVM चा वापर करतात, जेथे हे दोन गुणधर्म आढळले जात नाही. Red Hat Enterprise Linux 6.2 गेस्ट डिबगिंग क्षमता KVM स्टॅक अंतर्गत सुधारित करते, ज्यामुळे वापरकर्ता अतिथी अंतर्गत NMIs सुरू करतो व अतिथीकरीता SysRq कि क्रम पाठवतो.
वर्च्युअल मशीन बूट अप प्रवेश सुधारित करतो
डाटा सेंटर्स् वर्च्युअलाइज करणाऱ्या वापरकर्त्यांनी अतिथी बूट अप प्रोसेस नियंत्रीत ठेवायला हवे व सुरवातीपासून संपूर्ण BIOS व कर्नल बूट अप संदेश दाखवायला हवे. हे गुणधर्म न आढळल्याने वापरकर्ते बूट करण्यापूर्वी virsh कंसोलचा वापर करण्यापासून वंचीत राहतात. नवीन संकुल, sgabios, Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये समाविष्ट केले आहे, ज्यामुळे हि क्षमता पुरवलि जाते, qemu-kvm करीता काहिक ठराविक समावेशसह.
लाइव्ह स्नॅपशॉटस्
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये लाइव्ह स्नॅपशॉट गुणधर्म टेकनॉलजि प्रिव्युऊ म्हणून समाविष्ट केले आहे. लाइव्ह स्नॅपशॉट गुणधर्म हार्ड ड्राइव्हवरील वर्च्युअल मशीनचे ऑटोमॅटिक बॅकअप पुरवते, व वर्च्युअल डिस्कस्चे पेन ड्राइव्ह स्नॅपशॉट पुरवतो, ज्याकरीता बाहेर qcow2 इमेजेस्चा वापर केला जातो. जेवढे डिस्कस् उपलब्ध आहेत तेवढे स्नॅपशॉटस् घेण्याकरीता qemu घटके पुरवून बहु-डिस्क लाइव्ह स्नॅपशॉट निर्माण डाटाची एकाग्रता नियंत्रीत करण्यास मदत पुरवते. म्हणूनच, मल्टि-डिस्क स्नॅपशॉटमध्ये एकाच वेळीचे डाटा समाविष्टीत असणारे सर्व डिस्कस् आढळले जातिल.
फाइल सिस्टम एकाग्रताची मर्यादा ओळखणे महत्वाचे आहे. तरी, स्नॅपशॉट इमेजचे पुनःवापर क्रॅस कंसिस्टंट आहे. वापरकर्त्याला फाइल सिस्टम तपासणी (fsck) चालवावे लागेल किंवा जर्नल एंट्रिज् रिप्ले करावे लागेल, जे पावर कार्ड ओढल्यावर बूटिंग प्रमाणेच आहे.
मल्टि-प्रोसेसर (NUMA) ट्युनिंग सुधारणा
USB सुधारणा
USB 2.0 इम्युलेशन qemu-kvm करीता लागू केले आहे. हे फक्त QEMU करीता प्रत्यक्षरित्या लागू होते. Libvirt समर्थन पुढच्या प्रकाशनकरीता प्लॅन केले आहे.
रिमोट वेकअप USB होस्ट कंट्रोलरकरीता समाविष्ट केला आहे. अतिथी OS च्या सहाय्याने वारंवार 1000hz पोलिंग मोड थांबवणे व साधनला स्लिपमोडमध्ये नेते. पावरचा वापर व USB माऊस इम्युलेशन (किंवा टॅबलेट) — प्रत्येक वर्च्युअल मशीनकडे सर्वसाधारणपणे उपलब्ध असणारे साधन, यासह वर्च्युअल मशीनचे CPU वापर सुधारित करते.
Xen सुधारणा
मेमरि बलुनिंग
मेमरि बनुलिंग आत्ता Red Hat Enterprise Linux 6 पॅरावर्च्युअलाइज्ड् Xen अतिथींतर्फे समर्थीत आहे.
डोमैन मेमरि लिमिट
x86_64 domU PV अतिथींकरीता मेमरि मर्यादा 128 GB पर्यंत वाढवले आहे: CONFIG_XEN_MAX_DOMAIN_MEMORY=128.
टाइम अकाउटिंग
xen_sched_clock लागूकरण (जे अनस्टोलन नॅनोसेकंदची संख्या पुरवते) xen_clocksource_read लागूकरणतर्फे अदलाबदल केले आहे.
वर्च्युअलाइजेशन दस्तऐवजीकरण
Red Hat Enterprise Linux वर्च्युअलाइजेशन गाइडला अनेक विविध गाइड्स्मध्ये विभाजीत केले आहे:
spice-protocol
संकुल spice-protocol यास आवृत्ती 0.8.1 करीता सुधारित केले आहे, ज्यामध्ये खालील नवीन गुणधर्म पुरवले जातात:
  • वॉल्युम बदलकरीता समर्थन
  • async गेस्ट I/O राइट्स् व इंटरप्टस् करीता समर्थन
  • सपोर्ट फॉर सस्पेंड (S3) संबंधित गेस्ट I/O राइट्स्
  • गेस्ट बग निर्देशीत करणाऱ्या इंटरप्टकरीता समर्थन
Linux कंटेनर्स्
Linux कंटेनर्स् ॲप्लिकेशन रनटाइमकरीता बेअर-मेटल प्रणालीवर वर्कलोडला संपूर्ण वरच्युअलाइज न करता ॲप्लिकेशन रनटाइम कंटेनमेंटकरीता सोयीचे मार्ग पुरवते. Red Hat Enterprise Linux 6.2 ॲप्लिकेशन स्तराचे कंटेनर्स् पुरवते व cgroup व नेमस्पेसेस् तर्फे ॲप्लिकेशन स्रोत वापर करार नियंत्रीत करते. हे प्रकाशन कंटेनर लाइफ-साइकलकरीता मुळ व्यवस्थापन प्रस्तुत करते ज्यामुळे libvirt API व virt-manager GUI तर्फे कंटेनलर्स्चे निर्माण, संपादन व नष्ट करणे स्वीकारले जाते. Linux कंटेनर्स् टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे.
Red Hat Enterprise वर्च्युअलाइजेशन हायपरवाइजर RPM मल्टि-इंस्टॉलेबल
साइड-बाय-साइड rhev-hypervisor संकुलचे प्रतिष्ठापन स्वीकारण्यासाठी, /etc/yum.conf फाइल संपादित करून व installonlypkgs पर्याय समाविष्ट करून rhev-hypervisor यास फक्तप्रतिष्ठापनजोगी संकुल बनवण्याकरीता यमला संरचीत करा:
[main]
...
installonlypkgs=rhev-hypervisor
installonlypkgs पर्याय विभागाच्या अंतर्गत yum.conf मॅन पृष्ठमध्ये (man yum.conf 5) आढळणारे फक्तप्रतिष्ठापनजोगी संकुलांची पूर्वनिर्धारित सूची समाविष्ट करणे देखील आवश्यक आहे.

Chapter 16. ग्राफिक्स्

Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये शिप केलेले X सर्व्हर यास अपस्ट्रिम X.org 1.10 X सर्व्हर व अपस्ट्रिम Mesa 7.11 प्रकाशनांकरीता सुधारित केले आहे. X सर्व्हरमध्ये आंतरिक मांडणीत बदल आढळले ज्यामुळे सर्व व्हिडिओ व इंपुट ड्राइव्हर्स् यास सुधारित करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, नवीन हार्डवेअर सपोर्ट व बग निवारण समाविष्ट करण्यासाठी कर्नल ग्राफिक्स् समर्थनला सुधारित केले आहे.
AMD
ATI/AMD GPU सिरिज् HD2xxx, HD4xxx, HD5xxx, FirePro करीता सुधारित समर्थन. नवीन HD6xxx सिरिजकरीता, FirePro सिरिजमधील नवीन मॉडलकरीता व नवीन मोबाईल GPU HD6xxxM सिरिजकरीता समर्थन समाविष्ट केले आहे.
Intel
Intel IvyBridge-क्लास चिपसेटस्करीता समर्थन समाविष्ट केले आहे.
Nouveau
2D/Xv ॲक्सिलरेशन आत्ता GeForce GT2xx (व Quadro समान) यावर समर्थीत आहे. सस्पेंड/रेज्युम समर्थन सुधारित केले आहे.
X सर्व्हर
RandR-सक्षम ड्राइव्हर्स् (intel, nouveau, radeon) आत्ता एसिमेट्रिक मल्टिहेड संरचनांमध्ये करसरला पडद्यावरील दृष्यास्पद क्षेत्रात मर्यादित केले जाते.
कम्पोजिट एक्सटेंशन आत्ता फंक्शनल आहे जेव्हा Xinerama याचा वापर एकापेक्षा जास्त GPU करीता सिंगल डेस्कटॉप स्पॅन करण्यासाठी केला जातो.
/etc/X11/xorg.conf.d/ अंतर्गत /etc/X11/xorg.conf ला समावेष करून X सर्व्हर संरचना आत्ता कदाचित संरचना फाइल स्निपेटस्सह व्यवस्थापीत करणे शक्य आहे. रनटाइमवेळी साधन X सर्व्हरकरीता उपलब्ध झाल्यावर या स्निपेटमधील X.org इंपुट साधन संरचना लागू होते.
अगाऊ माहितीकरीता 1.10 X सर्व्हर अपस्ट्रिम घोषणा पहा: http://lists.freedesktop.org/archives/xorg-announce/2011-February/001612.html.
Mesa
प्रकाशन टिपांकरीता Mesa 7.11 अपस्ट्रिम घोषणा: http://mesa3d.org/relnotes-7.11.html पहा.

Chapter 17. सामान्य सुधारणा

माताहारि
x86 व AMD64 आर्किटेक्चर्स् करीता Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये माताहरि संपूर्णतया समर्थीत आहे. इतर आर्किटेकर्सकरीता बिल्डस् यास टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून घोषीत केले जाते.
ऑटोमॅटिक बग रिपोर्टिंग टूल
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये ABRT 2.0 समाविष्टीत आहे. ABRT सॉफ्टवेअर क्रॅशचे तपशील स्थानीय प्रणालीवर करतो, व विविध इश्युउ ट्रॅकर्सकरीता, Red Hat समर्थन समाविष्टीत, इश्युउज् रिपोर्ट करण्यासाठी इंटरफेस (दोंही ग्राफिकल व आदेश ओळ आधारित) पुरवतो. हि सुधारणा खालील लक्षणीय सुधारणा पुरवते:
  • नवीन रचनासह अधिक लवचिक संरचना.
  • आउट-ऑफ-प्रोसेस् प्लगइन्स् (प्लगइन्स् वेगळ्या प्रोसेस् अंतर्गत चालवले जातात व इंटर-प्रोसेस् कम्युनिकेशनतर्फे इतर प्रोसेससह संपर्क करते). या डिजाइनचे फायदे खालील प्रमाणे आहे:
    • प्लगइन्स् मधील बग्स् मुख्य डिमनला खंडीत करत नाही,
    • बहुतांश प्रोसेसिंग आत्ता सर्वसाधारण (नॉन-रूट) वापरकर्ता अंतर्गत पूर्ण होत असल्याने अधिक सुरक्षित आहे,
    • प्लगइन्स् कोणत्याहि प्रोग्रामिंग भाषामध्ये लिहणे शक्य आहे.
  • बॅकएंडचे रिपोर्टिंग Red Hat च्या सर्व इश्युउ रिपोर्टिंग साधनांअंतर्गत शेअर केले जाते:
    • ABRT, sealert, python-meh चे सर्व वापरकर्ते (Anaconda, firstboot)
    • वरील सर्व साधने समान संरचना शेअर करत असल्याने, फक्त एकदाच लिहण्याची आवश्यकता आहे.

पुढील वाचन

ABRT संरचना व नवीन मांडणीविषयी अधिक माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux 6.2 वितरण पुस्तिका पहा.
IBM System z वरील Linux करीता ऑप्टिमाइज्ड् माथ लाइब्ररि
Red Hat Enterprise Linux 6.2 सिस्टम z वरील Linux करीता ऑप्टिमाइज्ड् लिनिअर अल्जेब्रा माथ लाइब्ररि पुरवते ज्यामुळे हाय प्रोफाइल फंक्शन्स् करीता कम्पाइलर कोड निर्माण करते, नवीन हार्डवेअर फंक्शन्स्चा पुरेपुर फायदा घेते.
सुधारित टॅबलेट समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.2 मध्ये Wacom साधनांकरीता समर्थन सुधारित केले आहे. साधनाला प्लग अशक्य व शक्य केल्यानंतर साधन संरचनाला पुनः संरचीत करणे आवश्यक नाही.
सुधारित वायरलेस् ओळख
NetworkManager आत्ता पार्श्वभूमीत वायरलेस नेटवर्ककरीता शोध घेते, उत्तम वापरकर्ता अनुभव पुरवते.
GNOME मध्ये CPU समर्थनमध्ये वाढ
gnome-system-monitor युटिलिटि आत्ता 64 पेक्षा जास्त CPU असणाऱ्या प्रणालीला नियंत्रीत करते.

कम्पोनंटची आवृत्ती

हे अप्पेंडिक्स् घटकांची व Red Hat Enterprise Linux 6.2 प्रकाशनातील परस्पर आवृत्तींची सूची आहे.
कम्पोनंट
आवृत्ती
कर्नल
2.6.32-202
QLogic qla2xxx ड्राइव्हर
8.03.07.05.06.2-k
QLogic qla2xxx फर्मवेअर
ql23xx-firmware-3.03.27-3.1
ql2100-firmware-1.19.38-3.1
ql2200-firmware-2.02.08-3.1
ql2400-firmware-5.06.01-1
ql2500-firmware-5.06.01-1
एम्युलेक्स lpfc ड्राइव्हर
8.3.5.45.2p
iSCSI इनिशिअटर युटिल्स्
6.2.0.872-27
DM-मल्टिपाथ
0.4.9-43
LVM
2.02.87-3
X सर्व्हर
1.10.4-3
Table A.1. कम्पोनंटची आवृत्ती

आवृत्ती इतिहास

Revision History
Revision 1-0Mon Dec 5 2011Martin Prpič
Release of the Red Hat Enterprise Linux 6.2 Release Notes